Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shahid Kapoor Video: पत्नीच्या 'त्या' सवयीने शाहिद कपूर हैराण, व्हिडीओत करून दाखवली नक्कल

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडप्यांपैकी एक आहे.

Shahid Kapoor Video: पत्नीच्या 'त्या' सवयीने शाहिद कपूर हैराण, व्हिडीओत करून दाखवली नक्कल

Shahid Kapoor Video: शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडप्यांपैकी एक आहे. लोकांना या दोघांना एकत्र पाहायला आवडते. शाहिद आणि मीराची केमिस्ट्रीही चांगलीच पसंतीस उतरली आहे. हे जोडपं एकमेकांचे पाय खेचण्याची कोणतीही कसर सोडत नाहीत. अलीकडेच शाहिद कपूरने आपल्या पत्नीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून मीराच्या एका सवयीमुळे नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी मीराने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोवरही शाहिदने तिला ट्रोल केले होते.

शाहिद कपूरने नुकताच एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या पत्नीची एक सवय उघड केली आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद मीराच्या फोन वापरण्याच्या सवयीची खिल्ली उडवताना दिसत आहे. शाहिदने  मीराची केलेली नक्कल पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. याआधीही शाहिदने मीराच्या फोन वापरण्याच्या सवयीची अनेकदा खिल्ली उडवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत अलीकडेच सुट्टीवर गेले होते. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मीराने तिच्या युरोप ट्रिपमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपे बेंचवर बसल्याचे दिसत आहेत. त्याचवेळी शाहिदने एक फोटो शेअर करत लिहिले की, ' 7 वर्षे पूर्ण झाली आहेत बेबी. हॅप्पी अनिवर्सरी, तू 7 कठीण वर्षे सुलभ केली आहेत. तू एक सर्वाइवर आहे आणि तू एक लीजेंड आहेस.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहिद कपूर शेवटचा 'जर्सी' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला पण तरीही 'जर्सी' बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला. शाहिदचे दोन चित्रपट प्रतीक्षेत आहेत, राज आणि डीके दिग्दर्शित 'फर्जी', ज्याद्वारे शाहिद ओटीटीवर पदार्पण करणार आहे. याशिवाय त्यांच्याकडे अली अब्बास जफरचा 'ब्लडी डॅडी' देखील आहे.

Read More