Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' व्यक्तीला हॉटेलच्या बंद खोलीत भेटण्याची King Khan वर का आली वेळ?

हॉटेलमधील शाहरुख खानच्या खोलीत 'ही' व्यक्ती आल्यानंतर...   

'या' व्यक्तीला हॉटेलच्या बंद खोलीत भेटण्याची King Khan वर का आली वेळ?

Shahrukh Khan : 'बडे बडे देशो मैं छोटी-छोटी बातें...' अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) हा डायलॉग चाहत्यांच्या आजही तोंडावर आहे. कोणतीही छोटी-मोठी गोष्ट घडली तर हा डायलॉग अनेक जण बोलतात. शाहरुख खानचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. असंख्या चाहत्यांची संख्या असलेला किंग खान कधीही चाहत्यांना नाराज करत नाही. त्यामुळे अभिनेत्याने चाहत्यांसाठी घेतलेला निर्णय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (Shahrukh Khan fan)

नुकताच सिनेमाच्या शुटिंगसाठी शाहरुख चेन्नईत थांबला होता. तेव्हा अभिनेत्याने चाहत्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अभिनेता चाहत्यांना भेटला आणि त्यांच्यासाठी काही खास गोष्टीही केल्या आणि याचा पुरावा एका फॅन क्लब पेजवर दिसत आहे. 

शाहरुखच्या चेन्नई फॅन क्लबने ट्विटरवर अभिनेत्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाहरुख काही चाहत्यांसोबत असल्याचं दिसत आहे. चेन्नईचे जवळपास 20 चाहते अभिनेत्यासोबत आहेत. व्यस्त वेळापत्रकातून चाहत्यांना वेळ दिल्यामुळे चाहत्यांनी देखील अभिनेत्याने आभार देखील मानले आहेत. 

शाहरुखच्या भेटीबद्दल चाहत्याने सांगितलं, मी पूजा ददलानी आणि शाहरुख खान सरांचे मॅनेजर करुणा यांना भेटलो. त्यांच्या मॅनेजरने शाहरुख यांना विचारलं आणि शूट संपल्यावर भेटण्याचं वचन दिलं. काही दिवसांनी मला पुन्हा फोन आला की, 'जवान'चे शूटिंग संपल्यानंतर म्हणजे 8 ऑक्टोबरला सर भेटतील. 

त्यानंतर शाहरुखच्या टीमने सुधीरला त्याच्या (Shahrukh Khan fan club) फॅन क्लबमधून 20 लोकांना निवडण्यास सांगितंल. सुधीर नावाच्या एका चाहत्याने पुढे सांगितले की, शाहरुखच्या टीमने आमच्यासाठी अभिनेता ज्या हॉटेलमध्ये राहत होता तिथे रूम बुक केली. त्यांनी आमच्यासाठी 2 खोल्या बुक केल्या. शिवाय आमच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करुन दिली. 

fallbacks

एवढंच नाही तर शाहरुखने चाहत्यांच्या भेटवस्तू देखील दिल्या. शाहरुखच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरच 'जवान' सिनेमातून चाहच्यांच्या भेटीस येणार आहे.

'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, सुनील ग्रोव्हर, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा ​​दिसणार आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट हा सिनेमा सादर करत आहे. सिनेमा पुढच्या वर्षी 2 जूनला रुपेरी दाखल होणार आहे.

Read More