Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरूख करतोय चौथ्या अपत्याचं प्लॅनिंग !

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सद्ध्या 'झिरो' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

शाहरूख करतोय चौथ्या अपत्याचं प्लॅनिंग !

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सद्ध्या 'झिरो' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

टेलिव्हिजनवर शाहरूख 'टेड टॉक्स इंडिया नई सोच' या शोमधूनही रसिकांच्या भेटीला येत आहे या कार्यक्रमामध्ये लोकं त्यांच्या आयुष्यातील खास आणि प्रेरणादायी क्षण शेअर करतात. या शोदरम्यान शाहरूखने त्याच्या चौथ्या अपत्याबाबत प्लॅन शेअर केला आहे.  

'आकांक्षा' बोलायला त्रास 

टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमामध्ये अनेकदा शाहरुखला 'आकांक्षा' बोलायचे होते. मात्र तो सारखाच अडखळत होता. अनेकदा त्याने रिटेक घेतले. या नावाला रिटेक घ्यावे लागणं हे लाजिरवाणं आहे. आता या नावाची सवय करण्यासाठी मला चौथ्या अपत्याचा विचार करावा लागेल असे शाहरूख म्हणाला. माझ्या चौथ्या अपत्याचं नाव 'आकांक्षा' ठेवेन असं तो म्हणाला. शाहरूख खानला यापूर्वी दोन मुलं आणि एक मुलगी आहे. शाहरुखचा लहान मुलगा अबरामचा जन्म सेरोगसी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाला आहे. 

आईचा खास फोटो केला शेअर  

'टेड टॉक्स इंडिया नई सोच' या कार्यक्रमामध्ये शाहरूखने त्याच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. सोबत आईचा फोटोही दाखवला. यावेळेस शाहरूख भावूक झाला होता. शाहरूखने दाखवलेल्या फोटोमध्ये त्याच्या आईने साडी नेसली होती. हा एकमेव फोटो असा आहे, ज्यात आईने साडी नेसली आहे.असे शाहरूख म्हणाला. 

Read More