Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल

बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

शाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांचा आगामी 'झिरो' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. यापूर्वी 'जब तक है जान' या सिनेमात दोघांची केमेस्ट्री पहायला मिळाली होती.

अभिनेता शाहरुख खान नेहमीच आपल्या सिनेमाच्या सेटवरचे फोटोज शेअर करत असतो. मात्र, आता शाहरुखने कतरिना कैफ सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये शाहरुख खान झोपताना दिसत आहे आणि आनंद एल राय त्याच्या उठण्याची वाट पाहत आहेत. तर, कतरिनाने पोज देत फोटो क्लिक केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहरुख खानने कतरिनाला आपली मीडिया मॅनेजर म्हटलं आहे.

हा फोटो पाहून स्पष्ट होत आहे की, सिनेमाच्या सेटवर किती मजा-मस्ती सुरु असते. या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read More