Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shahrukh Khan - आशुतोष राणा ज्ञानी आणि अंतर्यामी, रेणुका शहाणे यांनी शाहरुखला दिलं 'हे' उत्तर

Shahrukh Khan नं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यावर उत्तर देत रेणुका शहाणेनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

Shahrukh Khan - आशुतोष राणा ज्ञानी आणि अंतर्यामी, रेणुका शहाणे यांनी शाहरुखला दिलं 'हे' उत्तर

Shahrukh Khan Talk About Ashutosh Rana : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याचा आगामी चित्रपट 'पठाण'च्या (Pathaan) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख सतत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच शाहरुखनं ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी एका नेटकऱ्यानं शाहरुखला आशुतोष राणाबद्दल (Ashutosh Rana) काही बोलण्यास सांगितले. शाहरुखनं आपल्या पतीचे केलेले कौतुक ऐकूण त्यांची पत्नी रेणुका शहाणेनं (Renuka Shahane) शाहरुखला उत्तर दिले आहे. 

शाहरुखनं त्याच्या चाहत्यांशी ट्विटरवर (Ask Me Anything) द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. यावेळी शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या आशुतोष राणा यांच्या विषयी एका नेटकऱ्यां प्रश्न विचारला. शाहरुख त्या चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत म्हणाला, 'ते एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच ज्ञानी आणि अंतर्यामी आहेत.' 

fallbacks

शाहरुखनं आपल्या पतीचे कौतुक केल्याचे पाहून रेणूका शहाणे स्वत: ला रोखू शकल्या नाही आणि त्यांनी शाहरुखला उत्तर दिले. रेणूका कमेंट करत म्हणाला, 'तू खरोखर दयाळू आणि खरं बोलणारा व्यक्ती आहेस'. याशिवाय रेणूका यांनी हात जोडण्याचे इमोजी देखील वापरले आहे. दरम्यान, यावेळी नेटकऱ्यांनी शाहरुखला वेगवेगळे प्रश्न विचारले एका नेटकऱ्यानं शाहरुखला त्याच्या मानधनाविषयी विचारले. तर काही नेटकऱ्यांनी त्याला चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. 

fallbacks

आशुतोष राणा 'पठाण'मध्ये

'पठाण' चित्रपटात आशुतोष राणा कर्नल सुनील लुथरा ही भूमिका साकारत आहेत. सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटात शाहरुख खान रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे, दीपिका पदुकोण एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आशुतोषसोबत डिंपल कपाडिया देखील दिसणार आहे. स्पाय थ्रिलर चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : लग्नानंतर Akshaya Deodhar ची पहिली मकर संक्रांत, अभिनेत्रीचा Festive लूक व्हायरल

बेशरम रंग गाण्यामुळे पठाण चित्रपट आला होता वादात

'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य (Sant Paramhans Acharya) यांनी शाहरुख खानला धमकी दिली आहे. शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी धमकी देण्यात आलीय.भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत

Read More