शाहरुख खान आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतो. विशेष म्हणजे त्याच्या बहिणीबद्दल. मात्र, अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने आपल्या बहिणीच्या जीवनातील वेदनादायी प्रसंग शेअर केला होता. त्यावेळी शाहरुखने सांगितले होते की, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची बहीण शहनाज लालारुख खान जवळपास मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचली होती.
बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या शाहरुख खानने आपल्या आयुष्यात अनेक मोठ्या दुखांना सामोरे जावे लागले आहे. केवळ 14 वर्षांचा असताना त्याने वडील मीर ताज मोहम्मद खान यांना गमावले. या घटनेचा सर्वाधिक आघात त्याच्या बहिणीला झाला आणि ती मानसिकदृष्ट्या खचून गेली. त्यानंतर 10 वर्षांनी त्यांच्या आईचाही मृत्यू झाला, ज्यामुळे शहनाजची स्थिती आणखीनच गंभीर झाली.
शाहरुखने मुलाखतीत सांगितले, 'वडिलांच्या मृत्यूवेळी माझी बहीण त्यांच्या मृतदेहासमोर उभी होती. ती काहीच बोलली नाही, रडलीही नाही. अचानक ती खाली कोसळली आणि तिचे डोके जोरात जमिनीवर आदळले. त्यानंतर दोन वर्ष ती काहीही न बोलता, फक्त शून्यात पाहत राहिली. ती ते दोन वर्षे रडलीही नाही'.
हे ही वाचा: 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी पहिली पसंत कार्तिक आर्यन नव्हे तर 'हा' अभिनेता होता
'दिलवाले दुल्हनिया लो जाऐंगे'च्या शुटींगदरम्यान शहनाजची प्रकृती इतकी बिघडली होती की, डॉक्टरांनी तिच्या जगण्याबाबत आशा सोडली होती. त्यानंतर शाहरुखने तिला स्वित्झर्लंडमध्ये नेले होते. जिथे तिच्यावर उपचार सुरू होते, तर तो दुसरीकडे 'तुझे देखा तो ये जाना सनम' गाण्याचे शूटींग करत होता. त्यानंतर 10 वर्षांनी त्यांच्या आईचाही मृत्यू झाला, ज्यामुळे शहनाजची स्थिती आणखीनच गंभीर झाली.
शाहरुखने पुढे सांगितले की, 'माझ्या बहिणीला आमच्या पालकांचा मृत्यू पचवता आला नाही, जरी ती यशस्वी आणि शिकलेली वकील होती. तरीही तिने हार पत्कारली होती. मी स्वतःला या दुःखापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मी जे धाडस दाखवतो, विनोद करतो, हे सगळं मी माझ्या वेदना लपवण्यासाठी करतो. जर मी हे केलं नाही, तर मी नैराश्याच्या दिशेने जाऊ लागेन.'
त्याने स्पष्ट केलं की त्याच्या आयुष्यातील या गोष्टी त्याच्या फिल्मी वागणुकीमागचं खरं कारण आहेत. शाहरुखच्या मते, त्याची मुले त्याच्यापेक्षा त्याच्या बहिणीवर अधिक प्रेम करतात. आणि तो त्याचा बहिणीचा खूप आदर करतो.