Marathi News> मनोरंजन
Advertisement

#METOO मध्ये ब्लॅकमेलींग जास्त- शक्ती कपूर

#METOO मोहिमेमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शक्ती कपूर यांनी केला आहे.

#METOO मध्ये ब्लॅकमेलींग जास्त- शक्ती कपूर

मुंबई : #METOO मोहिमेमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शक्ती कपूर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी विनंतीही त्यांनी केलीये. #METOO मोहिमेवर शक्ती कपूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

केवळ आरोप झाल्यानं अनेकांचं आयुष्य संपतं. त्यांना नोकरीवरुन काढून टाकलं जातं. एवढंच काय तर बायका-मुलं देखील संशयानं पाहतात, असं शक्ती कपूर यांनी म्हंटलयं. आरोप झालेल्या पुरुषाचं नाव गुन्हा सिद्ध झाल्यानंतरचं जाहीर करावं, तोपर्यंत त्या व्यक्तीची होणारी बदनामी रोखावी अशी मागणी शक्ती कपूर यांनी केली आहे. 

Read More