Marathi News> मनोरंजन
Advertisement

भयानक मानसिक आजारातून अभिनेत्री बाहेर, पुन्हा बोल्ड अंदाजात

शमाने 'बालवीर' या सीरियलमध्ये 'भयंकर परी' ची भूमिका निभावली होती. दरम्यानच्या काळात ती मानसिक आजाराचा बळी ठरली होती.

भयानक मानसिक आजारातून अभिनेत्री बाहेर, पुन्हा बोल्ड अंदाजात

मुंबई : २००३ साली सोनी टीव्हीवरील आलेल्या 'ये मेरी लाईफ है' या सीरियलच्या माध्यमातून अभिनेत्री शमा सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. पण आपल्या हॉट अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असत. 'ये मेरी लाईफ है' नंतर शमाने 'बालवीर' या सीरियलमध्ये 'भयंकर परी' ची भूमिका निभावली होती. दरम्यानच्या काळात ती मानसिक आजाराचा बळी ठरली होती.

मीडियात आलेल्या वृत्तांनुसार, शमा सिकंदरने एकेकाही त्रस्त होऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. आता ती मनमोकळेपण या आजारावर बोलते. बायपोलर डिसऑर्डरने ती त्रस्त होती. तो माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. मी त्यावेळी कशी जगत होती मलाच माहीत नाही.

'मी इतकी स्ट्रॉंग आहे की त्या परिस्थितीवर मात करु शकले हे जाणून मी आजही हैराण होत असल्याचे' ती सांगते. तिने नुकताच एक फोटो शेअर करुन 'अब दिल की सुन' असे कॅप्शन त्याला दिले आहे. यामध्ये ती लाल रंगाची बिकनी घालून हॉट योगा करतेय. 

यावरून ती आता सकारात्मक दिशेने चालल्याचे दिसून येत आहे

 

शमाने शॉर्ट फिल्म 'सेक्सोहॉलिक'च्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पूनरागमन केलं होतं.

या शॉर्ट फिल्ममध्ये शमाचा दमदार अभिनय, हॉट सीन आणि किसींग सीन्सचा भडीमार होता.

 

One who knows himself is never disturbed by what others think about him.

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

काही दिवसांपूर्वी शमा सिकंदरने शेअर केलेल्या फोटोतील कॅप्शनमध्ये असं काही लिहीलं जे सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

शमा सिकंदरने महिलांच्या शरीराच्या रचनेचं कौतुक करत महिलांसंदर्भात आपले विचार मोकळेपणाने मांडले. शमा सिकंदर एक चांगली मॉडेल आहे आणि तीने २०१० मध्ये आपली एक डिझायनिंग कंपनी सुरु केली आहे.

शमा सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असते.

Read More