Marathi News> मनोरंजन
Advertisement

राकेश आणि शमिताचं ब्रेकअप ? अभिनेत्याकडून अखेर सत्य समोर

राकेश आणि शमिताच्या नात्यात दुरावा? ब्रेकअपच्या चर्चांनंतर अभिनेत्याकडून सत्य समोर  

राकेश आणि शमिताचं ब्रेकअप ? अभिनेत्याकडून अखेर सत्य समोर

मुंबई : अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत होत्या. बिग बॉस ओटीटी शोमध्ये त्यांच्या प्रेमाचा गुलाब बहरला. त्यानंतर दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्या प्रेमाचे किस्से तुफान रंगले. पण आता दोघांचं ब्रेकअप झालं आहे का? अशी चर्चा रंगत आहे. 

याच दरम्यान राकेश आणि शमिता दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. एक पोस्ट शेअर करत दोघे म्हणाले, 'आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो आमच्या नात्याबद्दल ज्या अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका... यामध्ये काही तथ्य नाही...'

fallbacks

सध्या राकेश आणि शमिताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी शमिताने राकेशसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर आता ब्रेकअपच्या रंगणाऱ्या चर्चांवर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण सध्या तरी दोघांच्या पोस्टमधून असं स्पष्ट होत आहे की, त्यांचं ब्रेकअप झालेलं नाही...

Read More