Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ganesh Chaturthi : शेट्टी सिस्टर्स एकमेकांपासून लांब, पण आऊटफिट मात्र सारखंच

 शिल्पाने मुलगी शमिशासोबत गणरायाची पुजा केली. 

Ganesh Chaturthi : शेट्टी सिस्टर्स एकमेकांपासून लांब, पण आऊटफिट मात्र सारखंच

मुंबई : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिल्पा शेट्टी आणि तिची मुलगी समिशासह बिग बॉसच्या घरात असलेल्या शमिता शेट्टीचा आऊटफिट मॅचिंग झाल्याचं दिसून आलं. शिल्पाने मुलगी शमिशासोबत गणरायाची पुजा केली. ज्याचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे . मुंबईत त्यांच्या घरी उत्सव साजरा करण्यात आला. तर यावेळी शमिता बिग बॉसच्या ओटीटी घरात होती.

शिल्पाने गणपतीची मूर्ती घरी आणताना स्वतःचे आणि तिच्या मुलांचे फोटो शेअर केले. शिल्पाने चमकदार गुलाबी पोल्का डॉट सूट परिधान केला होता आणि समिशाने अगदी मॅचिंग फॅब्रिकचा ड्रेस घातला होता.

नंतर, बिग बॉसच्या घरातील शमिताचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. ज्यात तिने स्लीव्हलेस ब्लाऊजसह चमकदार गुलाबी साडी नेसली होती. तिने, बिग बॉसच्या इतर स्पर्धकांसह एकत्रितपणे गणरायाची पूजा केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 


यावेळी तिने बहिण शिल्पाला मॅचिंग अशीच साडी नेसली होती. यंदा ती शिल्पासोबत घरी गणेश चतुर्थी साजरी करु शकली नाही. पण नेहमी प्रमाणे मॅचिंग आऊटफिटमध्ये एकत्र बाप्पाची पूजा करणाऱ्या बहिणींनी वेगवेगळा असताना ही सारखेच आऊटफिट घातले  होते.

Read More