Marathi News> मनोरंजन
Advertisement

शमिता शेट्टीने राकेशकडे मागितलं Kiss, म्हणाली, इथे ये आणि मला...

बिग बॉस ओटीटी शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.

शमिता शेट्टीने राकेशकडे मागितलं Kiss, म्हणाली, इथे ये आणि मला...

मुंबई : बिग बॉस ओटीटी शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. स्पर्धक शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील वाढती जवळीक. दोघांनी घरात कनेक्शन म्हणून प्रवेश केला होता आणि आता शेवटच्या काही एपिसोडमध्ये दोघेही एकमेकांसोबत खास कनेक्शन शेअर करताना दिसले. एवढेच नाही तर दोघेही एकमेकांसाठी खूप भावनिक झाले आहेत.

शमिताने राकेशकडे मागितलं Kiss

शोमधील एक क्लिप व्हायरल झाली. ज्यात शमिता शेट्टी राकेश बापटला तिच्या गालावर किस करायला सांगते आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शमिता राकेशला स्वयंपाकघरात काहीतरी शिकवताना दिसत आहे.

क्लिपमध्ये, शमिता डायनिंग टेबलवर बसून काहीतरी खात आहे. यावर राकेश म्हणतो की, आणखी काही? शमिता डोळे मोठे करुन पाहते. यावर राकेश म्हणतो अरे तुला राग का येत आहे ? ... यावर शमिता म्हणते, "इथे ये आणि मला आत्ताच किस कर" . त्यानंतर शमिता नंतर खाण्यात व्यस्त होते.

Read More