Marathi News> मनोरंजन
Advertisement

शशांक केतकर छोट्या पडद्यावरील कमबॅकसाठी सज्ज

प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय. नव्या टीव्ही शोद्वारे तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

शशांक केतकर छोट्या पडद्यावरील कमबॅकसाठी सज्ज

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय. नव्या टीव्ही शोद्वारे तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिलीये. तो म्हणाला, हो मी लवकरच टीव्हीवर परततोय. नव्या भूमिकेत दिसणार आहे. छोट्या पडद्यांवरील आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका थोडी वेगळी असणार आहे. या शोचे टेक्निशियम आणि क्रू टीममधील बरीच मंडळीही ही होणार सून मी या घरची मालिकेतील आहेत. 

शशांक पुढे म्हणाला, पुढील एक ते दीड महिन्यात हा नवा शशांकचा हा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या नव्या मालिकेबद्दल मी खूपच एक्साईटेड आहे. यात मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

शशांकला झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून मोठा ब्रेक मिळाला होता. या मालिकेत शशांकने श्रीरंग अर्थात श्री गोखले ही भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. यासोबतच त्याने कालाय तस्मै नम:, इथेच टाका तंबू, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेतही काम केले होते. 

गेल्या वर्षी ४ डिसेंबरला शशांक प्रियंका ढवळे हिच्याशी लग्नबंधनात अडकला. प्रियंका ही पेशाने वकील आहे. 

 

Work • Save • Travel • Repeat

A post shared by Shashank Shirish Ketkar (@shashankketkar) on

 

Read More