Aruna Irani Birthday Special : बॉलिवूडमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी कलाकार वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री जिनं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या अभिनेत्री ते खलनायिका साकारत सगळ्यांच्या मनात जागा केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण? तर त्या अभिनेत्रीचं नाव अरुणा ईरानी आहे. अरुणा आज त्यांच्या 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांची 'बेटा' चित्रपटातील खलनायिकेची भूमिका तर सगळ्यांना माहितच आहे. मात्र, त्यांच्या खासगी आयुष्यात असं काही तरी झालं की त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला राम राम केला.
अरुणा यांनी त्यांच्या करिअरमध्ये 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण त्यांनी बऱ्याच काळानंतर इंडस्ट्रीला रामराम केला. त्याविषयी त्यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. अरुणा यांनी सांगितलं की त्यांनी कोव्हीडला जवळून पाहिलं आहे. आपलेच लोकं एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरायचे. हे खरंच खूप वाईट होतं. अरुणा ईरानी यांनी याच मुलाखतीत सांगितलं की कोव्हीड काळात त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना काम करू नको असा सल्ला दिला.
अरुणा यांच्या कुटुंबातील लोकांची इच्छा नव्हती की त्यांनी घराच्या बाहेर जाऊन शूट करावं आणि स्वत: चं आजाराला निमंत्रण द्यावं. त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी तो पर्यंत काम करायला नको जो पर्यंत परिस्थिती ही ठीक होत नाही. अरुणा यांनी हे देखील सांगितलं की त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप काम केलं. वाढत्या वयानुसार त्याकाळात काम करणं हा योग्य पर्याय आहे. त्यामुळेच त्या छोट्या आणि मोठ्या पडद्यापासून लांब आहे.
हेही वाचा : मुघल राजाच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांचं काय व्हायचं? जोधाबाई, नूरजहाँ अन् मुमताज...
अरुणा यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्या 9 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. तर 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या गंगा जमुना या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांनी जेव्हा काम केलं तेव्हा त्या 9 वर्षांच्या होत्या. त्यांना दोन भाऊ असून इंद्र कुमार आणि आदि ईरानी अशी त्यांची नावं आहेत. ते दोघं ही चित्रपटसृष्टीशी संबंधीत आहेत.