Marathi News> मनोरंजन
Advertisement

हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या शेफाली जरीवालाने 'या' गंभीर आजारावर केलेली मात; लहानपणापासून 15 वर्ष देत होती झुंज

काँटा लगा' या गाण्यातून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की लहानपणी ती एका आजाराने ग्रस्त होती. 

हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या शेफाली जरीवालाने 'या' गंभीर आजारावर केलेली मात; लहानपणापासून 15 वर्ष देत होती झुंज

Shefali Jariwala: अभिनेत्री शेफाली जरीवालाचे 27 जूनच्या रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने तिने जगाचा निरोप घेतला. या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्व शोकमग्न झाले असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिच्या अकाली जाण्याने चाहत्यांचेही मन सुन्न झाले आहे.

पण खूप कमी लोकांना माहितीये की शेफालीने लहान वयापासूनच एका गंभीर आजाराशी लढत होती. त्यामुळे प्रसिद्धी मिळूनही ती फारसे प्रोजेक्ट स्वीकारू शकली नाही. एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःच याची कबुली दिली होती आणि लोकांना याबद्दल जागरूकही केलं होतं.

लहान वयातच अपस्माराशी झुंज सुरू
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शेफालीला अपस्माराचा (Epilepsy) पहिला झटका आला. त्या काळात तिला अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करायची होती, त्यामुळे तिच्यावर जबरदस्त मानसिक दडपण होतं. याच तणावामुळे आणि चिंतेमुळे तिला हा आजार झाला.
ती म्हणाली होती, 'तणाव, नैराश्य आणि अपस्मार (Epilepsy) हे एकमेकांशी जोडलेले असतात. नैराश्यामुळे अपस्माराचे झटके येऊ शकतात किंवा काही उलटही होऊ शकते.' अपस्माराचे हे झटके तिला शाळेत, रस्त्यावर चालताना, अगदी कुठेही येत होते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास खूप ढासळू लागला.

अपस्माराचा झटका म्हणजे काय? 
अपस्माराचा झटका म्हणजे Epilepsy attack. हा मेंदूचा विकार असून यामध्ये मेंदूमधील संदेशांची क्रिया अचानक अनियमित होते, ज्यामुळे व्यक्तीला झटके येतात. या झटक्यांमध्ये व्यक्तीचे अचानक हात-पाय ताठ होणे, थरथर कापणे, काही क्षण शुद्ध हरपणे किंवा विचित्र हालचाली करणे असे लक्षणे दिसू शकतात. हे झटके काही सेकंद ते काही मिनिटे टिकू शकतात. अपस्माराचे झटके अनेक कारणांमुळे येऊ शकतात - जसे मेंदूला झालेली इजा, जन्मजात दोष, जंतुसंसर्ग नैराश्य, तणाव किंवा कधी कधी कोणतेही स्पष्ट कारण नसते. यावर औषधे आणि योग्य उपचारांनी नियंत्रण ठेवता येते.

15 वर्षे दिली आजाराला झुंज

या आजारामुळेच शेफाली फारशा प्रोजेक्ट्समध्ये दिसली नाही. तिने सांगितले होते की, त्या काळात याबद्दल कोणाशी बोलणेही तिच्यासाठी खूप कठीण होते. तरीसुद्धा, कुटुंबाच्या प्रेमळ आधारामुळे आणि स्वतःच्या इच्छाशक्तीने तिने तब्बल 15 वर्षे या आजाराशी झुंज दिली.

 हे ही वाचा: एकेकाळी आत्महत्या करायला निघालेली 'ही' अभिनेत्री, आज मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये

'काँटा लगा'नंतर प्रसिद्धी शिखरावर असतानाही आरोग्याच्या लढाईत व्यस्त

'काँटा लगा' हे गाणे सुपरहिट झाल्यानंतर ती रातोरात स्टार झाली. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाही तिचे खाजगी जीवन या आजारामुळे सतत संकटात होते. म्हणूनच तिने नंतर फारसे प्रोजेक्ट स्वीकारले नाहीत.

आज शेफाली आपल्यात नसली तरी तिची संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा देणारी ठरेल. तिने जेव्हा तिच्या आजाराबद्दल खुलासा केला, तेव्हा असंख्य लोकांनी तिला धन्यवाद दिले कारण त्यामुळे त्यांनाही धीर मिळाला.

Read More