Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shekhar Suman यांनी पत्नीला भेट दिली इतकी महागडी कार, त्या किंमतीत मुंबईत येईल 2 BHK फ्लॅट

Shekhar Suman Gifts Wife luxurious car : अभिनेता शेखर सुमन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं पत्नीला इतकी महागडी गाडीत भेट केली आहे. तर त्यांनी शेअर केलेल्या फोटोनं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतक्रिया दिल्या आहेत. 

Shekhar Suman यांनी पत्नीला भेट दिली इतकी महागडी कार, त्या किंमतीत मुंबईत येईल 2 BHK फ्लॅट

Shekhar Suman : बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन 'बिग बॉस सीझन 16' च्या रविवारच्या एका खास सेगमेन्टचे सुत्रसंचालन करताना दिसले. इतकंच नाही तर ते इंडियाज लाफ्टर चॅम्पियन सीजन 1 चे परिक्षकही होते. शेखर सुमन आता कोणत्या कार्यक्रमामुळे लावलेल्या हजेरीमुळे नाही तर त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. शेखर सुमन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं पत्नीला चक्क 2.4 कोटींची गाडी भेट म्हणून दिली आहे. शेखर सुमन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. याविषयी खरं तर शेखर सुमन यांनी नाही तर त्यांच्या मुलानं पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

शेखर सुमन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पत्नीला इतकी महागडी गाडी भेट म्हणून दिली आहे. त्याचा फोटो शेखर सुमन यांचा मुलगा Addhyayan Summan नं शेअर केला आहे. त्यांनं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोत शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा गाडीला किस करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा. आई तुला बाबांकडून मिळालेल्या या स्पेशल भेटीसाठी तुला सगळ्यात जास्त शुभेच्छा. एक दिवस मी तुला रोल्स भेट देऊ शकेन. देवा मला त्यासाठी शक्ती आणि तुझा आशीर्वाद राहू दे, असं कॅप्शन त्यानं दिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेखर सुमन यांनी त्यांच्या पत्नीला भेट केलेली ही गाडी BMWi7 सीरिजची सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. हीच गाडी शेखर सुमन यांनी त्यांच्या पत्नीला भेट केली आहे. या गाडीची किंमत हे 2.4 कोटी आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य झाला आहे, पण तुम्ही जे वाचलत ते सत्य आहे की शेखर सुमन यांनी चक्क 2.4 कोटींची गाडी पत्नीला भेट केली आहे.  

हेही वाचा : 'मृत्यूच्या दारातून मी परतले...', मोठ्या धक्क्यातून सावरेल्या Niti Taylor कडून हादरवणारा खुलासा

शेखर सुमन यांचा हा फोटो पाहिल्यानंतर त्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, खूप खूप शुभेच्छा. दुसरा नेटकरी म्हणाला, तुमचा खूप अभिमान वाटतो. तिसरा नेटकरी म्हणाला, बधाई हो. तर फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रिटींनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस फेम मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील त्यांना शुभेच्छा देत म्हणाला, खूप खूप शुभेच्छा, तर काही नेटकऱ्यांनी शेखर सुमन यांनी इतकी महागडी गाडी घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Read More