Marathi News> मनोरंजन
Advertisement

'चूक झाली, एकमेकांशिवाय राहू शकत नाही ...', किआरा - सिद्धार्थ पुन्हा एकत्र

'शेहशाह' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.   

'चूक झाली, एकमेकांशिवाय राहू शकत नाही ...', किआरा - सिद्धार्थ पुन्हा एकत्र

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि किआरा आडवाणी (Kiara Advani) 'शेहशाह' (Shershaah)  सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण काही दिवसांपूर्वी किआरा आणि सिद्धार्थचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी  जोर धरला होता. ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत असताना किआरा-सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किआरा आणि सिद्धार्थ एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'कियाराने 'भूल भुलैया 2' च्या स्क्रीनिंगसाठी सिद्धार्थला आमंत्रित केले तेव्हा दोघांची भेट झाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा किआराने सिद्धार्थला फोन केला, तेव्हा दोघे भावुक झाले.'

'त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. ही चूक झाल्याचं दोघांच्या लक्षात आलं. तो कॉल खूप भावनिक होता' अशी माहिती ईटाईम्सला सांगताना सूत्रांनी दिली.

Read More