Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शेट्टीचा चक्क मुंबईच्या बसमध्येच व्यायाम..इतकंच काय बसही केली स्वच्छ

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अलीकडेच, शिल्पाने मंडे मोटिव्हेशन व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीचा चक्क मुंबईच्या बसमध्येच व्यायाम..इतकंच काय बसही केली स्वच्छ

मुंबईः शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अलीकडेच, शिल्पाने मंडे मोटिव्हेशन व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी बसमध्ये कसरत करताना दिसली. या व्हिडिओमध्ये शिल्पा तिच्या चाहत्यांना जबरदस्त फिटनेस गोल देताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी बसमध्ये असल्याचे दिसत आहे. ही बस त्यांना विमानतळावरून त्यांच्या फ्लाइटपर्यंत घेऊन जात असून बसमध्ये फक्त शिल्पा दिसत आहे. शिल्पाने या खास प्रसंगाचा फायदा घेत बसमध्येच कसरत सुरू केली.

हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "चलता-फिरता सोमवार प्रेरणा... बस रिकामी असल्याने घरी परतताना काही पुल-अप, पुश-अप आणि लंग्ज. 2 मोहिमा पूर्ण! फिट इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान! असं कॅप्शन शिल्पाने दिलं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही शिल्पा शेट्टीला पुल-अप आणि पुश-अप करताना पाहू शकता. यादरम्यान शिल्पाने बसमध्ये व्यायाम तर केलाच पण त्यानंतर बस ओल्या टिश्यूने निर्जंतुकही केली. व्हिडिओच्या माध्यमातून तिने तिच्या चाहत्यांना दोन संदेश दिले, जिथे एकीकडे ती लोकांना फिट इंडियासाठी प्रेरित करताना दिसली आणि दुसरीकडे स्वच्छ भारताचा संदेशही दिली.

शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. फिट राहण्यासाठी शिल्पा जीम, योगा, डाएट पाळते. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Read More