Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बाहुबली ड्रेस' म्हणतं नेटकऱ्यानं उडवली शिल्पा शेट्टीची खिल्ली; एक उर्फीचा उल्लेख करत म्हणाला...

Shilpa Shetty's New Look : शिल्पा शेट्टीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली...

'बाहुबली ड्रेस' म्हणतं नेटकऱ्यानं उडवली शिल्पा शेट्टीची खिल्ली; एक उर्फीचा उल्लेख करत म्हणाला...

Shilpa Shetty's New Look : बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांच्या फॅशनसाठी ओळखल्या जातात. त्या नेहमीच त्यांच्या फॅशनसोबत काही प्रयोग करताना दिसतात. अनेकदा त्यांच्या स्टाईलची स्तुती करतात तर अनेकदा त्यांची खिल्ली देखील उडवण्यात येते. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत झालं आहे. शिल्पा शेट्टीसोबत असंच काहीसं झालं आहे. तिनं सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. 

शिल्पा शेट्टी वयाच्या 49 व्या वर्षी देखील इतकी फीट आहे की तिच्या फिटनेसला पाहूण तरुणींना लाज वाटते. दोन मुलांची आई असली तरी तिचा फिटनेस हा खूप चांगला आहे. तर शिल्पाचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी ही रॅम्प वॉक करताना दिसत आहे. शिल्पानं लॅक्मे फॅशनवीकचा हा रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. शिल्पानं साडी नेसली असून त्याला हटके लूक देण्यासाठी कवच परिधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे काही स्वत: शिल्पानं स्टाईल केलं नसून डिझायनरनं तिला स्टाईल केलं आहे. यावेळी शिल्पा ही शो स्टॉपर होती. 

हेही वाचा : श्रीलीलासोबत अफेयरच्या चर्चांमध्ये कार्तिक आर्यननं शेअर केले रोमॅन्टिक फोटो

शिल्पानं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ हे बॅक स्टेजचे आहेत. त्यात एकात ती कवच परिधान करत आहे. हातात कडे आणि बाजूंवर सापाच्या आकाराचे बाजूबंद दिसत आहेत. एक एका व्हिडीओत ती अनुलोम-विलोम करताना दिसत आहे. तिनं कॅप्शनमध्ये तलवार चालवताना मोड असं म्हटलं आहे. ती योद्ध्याच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यावर लोकं मजेशीर कमेंट करत आहेत.  एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हे सुरक्षा कवच परिधान करून कोणत्या रणभूमिवर जाते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बाहुबली ड्रेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कवच मस्त दिसतंय हातात तलवार पाहिजे फक्त.' आणखी एक नेटकरी म्हणाला,'युद्ध कसं झालं?' दुसरा एक नेटकरी म्हणाला, 'उर्फी ट्रेंड होतेय आणि तू हे काय घातलंस.' तिसऱ्या नेटकऱ्यानं म्हटवं की, 'शिल्पा ही 21 वर्षांची दिसते.'

Read More