Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानसोबत अफेअरबद्दल काय बोलली शिल्पा शेट्टी

तो अर्ध्या रात्री माझ्या घरी यायचा....

सलमान खानसोबत अफेअरबद्दल काय बोलली शिल्पा शेट्टी

मुंबई : शिल्पा शेट्टी आणि सलमान खान बॉलिवूडमधील अतिशय चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. दोघांनी एकत्र 'औजार', 'गर्व : प्राइड अॅण्ड ऑनर', 'फिर मिलेंगे' आणि  'शादी कर के फंस गया यार' सारख्या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. सलमान खान जिथे त्याचा आगामी सिनेमा भारत आणि बिग बॉसमुळे चर्चेत आहे तर शिल्पा शेट्टी 'हिअर मी लव मी' या कारणामुळे चर्चेत आहे. 

एका मुलाखतीत शिल्पाने आपल्या जीवनातील अनेक गोष्टी शेअर केला. सलमान खानला डेट करण्यावरून तिने सांगितलं की, आम्ही फक्त मित्र आहे. आणि यापेक्षा दोघांमध्ये काहीच नाही असं देखील ती म्हणाली. सलमान अर्ध्या रात्री माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांसोबत ड्रिंक करत असे.

मी झोपलेली असायची आणि तो तासन् तास माझ्या वडिलांशी गप्पा मारायचा. माझ्या वडिलांच निधन झालं तेव्हा तो माझ्या घरी आला. सलमान खूप निराश होता तेव्हा फक्त काऊंटवर डोकं ठेवून बसला. 

नंतर आपल्या ब्रेकअपबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, मी मित्रांनी एका मुलाशी पैज लावली की, त्याने माझ्याशी रिलेशन ठेवावं. मी त्या मुलाच्या प्रेमात होते पण लवकरच आमचं ब्रेकअप झालं.

त्या मुलाची फक्त ती पैज जिंकण ऐवढीच इच्छा होती. हे सत्य समोर आल्यावर मी खूप निराश झाले. 

Read More