Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शेट्टीने साजरा केला मुलाचा शुगर फ्री बर्थडे...

शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असल्याचे वेगळे सांगायला नको. 

शिल्पा शेट्टीने साजरा केला मुलाचा शुगर फ्री बर्थडे...

मुंबई : शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असल्याचे वेगळे सांगायला नको. फिटनेससाठी ती हेल्दी फूड, योगा या सगळ्यावर विश्वास ठेवते. पार्टीतही शिल्पाचा फिटनेस फ्रिकनेस दिसून आला. शिल्पा शेट्टीचा मुलगा वियानच्या वाढदिवसानिमित्त तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीची खासियत म्हणजे ही पार्टी चक्क शुगर फ्री होती. शिल्पाचा मुलगा वियान २१ मे ला ६ वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीत बर्थडे केक कोकोनट शुगर, फ्रुट लॉलीज आणि याकुल्ट या हेल्दी आणि पौष्टीक घटकांपासून बनवलेला होता. या शुगर फ्री पार्टीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने आपल्या मुलांसह हजेरी लावली.

शिल्पा म्हणते...

याबद्दल शिल्पा म्हणाली की, दरवर्षी मुलाचा वाढदिवस असाच साजरा करते. पार्टीत रिफाईंड शुगरचा वापर न केलेले पदार्थ ठेवते. मी लंडनवरुन लॉलीपॉप मागवले आहेत. जे शुद्ध फळांपासून बनवलेले आहेत आणि त्यात रिफाईंड शुगर अजिबात नाहीये. डेजर्टसाठी कोकोनट शुगर आणि मधाचा वापर करण्यात आला आहे. 
पुढे ती म्हणाली की, मला असे वाटते की, आरोग्याची काळजी घेत खूप धमाल, मस्ती करायला मुलांना शिकवायला हवे. पुजा ढिंगराने कोकोनट शुगरपासून बनवलेला कप केक लंडनहुन मागवण्यात आला आहे आणि तो अत्यंत स्वादिष्ट आहे.

fallbacks

सेलिब्रेटींची हजेरी

सलनाम खानची बहिण अर्पिता खानही आपल्या मुलासह पार्टीत पोहचली. तर ऐश्वर्याने आराध्यासोबत पार्टीला हजेरी लावली. वियानची मावशी अभिनेत्री शमिका शेट्टीही आर्वजून उपस्थित राहीली होती. दिव्या खोसला कुमारही पार्टीत आपल्या मुलीसह आली होती. संजय दत्तची दोन्ही मुले या पार्टीत आली होती.

fallbacks

Aishwarya Rai Bachchan with Daughter attends Shilpa Shetty’s son’s birthday Party

fallbacks

Aishwarya Rai Bachchan with Daughter attends Shilpa Shetty’s son’s birthday Party

fallbacks

Aishwarya Rai Bachchan with Daughter attends Shilpa Shetty’s son’s birthday Party

Read More