Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल

 एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोवर मारामारी करताना दिसत आहेत. 

शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कॉमेडीचा बादशाह सुनील ग्रोवर आयपीएलची खास वेब सिरीज 'जियो धन धना धन' मध्ये व्यस्त आहे. यामध्ये सुनीलसोबत शिल्पा शिंदे आणि सुगंधा मिश्रादेखील काम करत आहेत. 'डॉ.गुलाटी'मुळे हा शो चर्चेत आहे. पण सध्या याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोवर मारामारी करताना दिसत आहेत. दोघेही आपल्या कॅरेक्टरमध्ये आहेत. सुनील शिल्पाचा हाथ पकडतो आणि तिला खाली पाडतो. त्यानंतर ती सावरते आणि पलटवार करायला सुरुवात करते. शूटींग दरम्यानचा हा व्हिडिओ आहे जेव्हा दोघेही एकमेकांवर हल्ला करतायत. यामध्ये शिल्पाच्या हसण्याचा आवाजही ऐकायला मिळतोय.  जियो अॅपवर सुरु असलेला सुनीलचा शो चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. खूप मोठा काळ वाट पाहिल्यानंतर सुनील चाहत्यांसमोर आलाय.

ग्लॅमर आणि क्रिकेटच्या कॉकटेल कॉमेडीचा तडका यामध्ये पाहायला मिळतोय.

Read More