Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरसोबत जाणार 'सात समुंदर पार' - पाहा व्हिडिओ

बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरच्या 'धन धना धन' या कॉमेडी शोमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. हे दोघं जण या नव्या कॉमेडी शोमध्ये नवरा - बायको म्हणून समोर येणार असून हा शो क्रिकेटवर आधारित सर्वात मोठा कॉमेडी शो असणार आहे. टी 20 सुरू असलेल्या सामन्यातील अनेक किस्से आपल्याला या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी यांचा असाच एक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरसोबत जाणार 'सात समुंदर पार' - पाहा व्हिडिओ

मुंबई : बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे सुनील ग्रोवरच्या 'धन धना धन' या कॉमेडी शोमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. हे दोघं जण या नव्या कॉमेडी शोमध्ये नवरा - बायको म्हणून समोर येणार असून हा शो क्रिकेटवर आधारित सर्वात मोठा कॉमेडी शो असणार आहे. टी 20 सुरू असलेल्या सामन्यातील अनेक किस्से आपल्याला या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी यांचा असाच एक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

या व्हिडिओत शिल्पा शिंदे आपल्याला मराठी पारंपरिक वेशात दिसत आहे. तसेच आतापर्यंत अजरामर गाण्याच्या यादीत समाविष्ट असलेल्या 'सात समुंदर पार' या गाण्यावर सुनील ग्रोवरसोबत दिसत आहे. या व्हिडिओत शिल्पा आपल्या अदांनी सगळ्यांना घायाळ करत आहे. या गाण्यातील लिपलॉक सिक्वेन्समध्ये अतिशय धम्माल करताना दिसत आहे. 

हा व्हिडिओ प्रिती सिमोन्स यांनी शेअर केला आहे. प्रिती सिमोन्स या कपिल शर्माच्या कॉमेडी शो आणि कॉमेडी नाईट विथ कपील मागील क्रिएटिव्ह ब्रेन असल्याच म्हटलं जात आहे. धन धना धन या शोमध्ये शिल्पा शिंदे गुगली देवीचा रोल प्ले करत आहे तर सुनील ग्रोवर यामध्ये प्रोफेसर LBW चा रोल साकारत आहे. सुनील ग्रोवर, शिल्पा शिंदे सोबत या शोमध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा, किकू शरद आणि बिग बॉसमध्ये स्पर्धक असलेला सुयश रॉय देखील आहे.

Read More