Marathi News> मनोरंजन
Advertisement

ही तर बेईमानी... ; कंगना राणौतला संजय राऊतांनी सुनावलं

हा काय तमाशा चालला आहे...   

ही तर बेईमानी... ; कंगना राणौतला संजय राऊतांनी सुनावलं

मुंबई : कायमच आपल्या जळजळीत वक्यव्यांसाठी आणि भुवया उंचावणाऱ्या गौप्यस्फोटांसाठी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिच्या एका ट्विटमुळं आता तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवणाऱ्या बी- टाऊनच्या या क्वीना आता शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही खडे बोल सुनावले आहेत. हा काय तमाशा चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी तिच्यावर आगपाखड केली. 

राम कदम यांच्या ट्विटला उत्तप देत कंगनानं आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते असं ट्विट करत म्हटलं होतं. 'मुव्ही माफीया गुंडापेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते', असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या; पण मुंबई पोलिसांकडून नको, असं तिनं ट्विटरवर म्हटलं आणि नव्या वादानं डोकं वर काढलं. 

कंगनाच्या याच ट्विटचा समाराच घेत राऊतांनी तिला आपल्याच शैलीत सुनावल्याचं पाहायला मिळालं. 'मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय', असं ते म्हणाले. 

राज्याच्या गृहमंत्री यांनी यावर तडतड उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्यानं घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, असा आग्रही सूर त्यांनी आळवला. 

 

ब़ॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांबाबत गेल्या काही दिवसांपासून सासत्यानं मोठे गौप्यस्फोट करणाऱ्या आणि यापुढंही अशी माहिती समोर आणण्याची तयारी दाखवणाऱ्या कंगनाला सुरक्षा मिळत नसल्याचा मुद्दा भाजप नेते राम कदम यांनी उचलून धरला होता. ज्यानंतर तिचं हे ट्विट आणि मुंबई पोलिसांबाबत केलेलं हे वक्तव्य तिला अडचणीत आणणारं ठरत आहे. 

 

Read More