Shoaib Ibrahim on Dipika Kakar's Health : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शोएब इब्राहिम सध्या त्याची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडच्या सर्जरी विषयी सोशल मीडियावर अपडेट देताना दिसला. शोएबनं सांगितलं की तिच्यावर जवळपास 14 तास सर्जरी करण्यात आली. याचा अर्थ सर्जरी ही बराच वेळ सुरु होती. लिवर कॅन्सरसाठी सर्जरी केल्यानंतर आता ती ठीक आहे. शोएबनं त्याच्या व्लॉगमध्ये दीपिकाची सर्जरी आणि तिच्या आरोग्याविषयी सविस्तर अशी अपडेट दिली आहे. त्यानं दीपिकासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले.
शोएबनं सांगितलं की 'उद्या ईद उल-अजहा आहे आणि आज अशा शुभ दिवसानिमित्तानं दीपिका आयसीयेच्या बाहेर आली आहे. खरंतर, मी आभारी आहे की ती आयसीयूमधून बाहेर आली आहे किंवा आमच्यासोबत आहे. ती तीन दिवसांपासून आयसीयूमध्ये होती आणि सर्जरीनंतर तिच्या अवस्थेत सुधारणार आहे. संध्याकाळच्या वेळी डॉक्टरांनी तिला रूममध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. काही दिवस ती इथे राहणार कारण सर्जरी मोठी होती आणि ती जवळपास 14 तास सुरु होती.'
शोएबनं पुढे सांगितलं की आम्ही सगळे चिंतेत होतो कारण डॉक्टरांनी सांगितलं की 'ही सर्जरी बराचकाळ राहणार. तिला सकाळी 8.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर रात्री11.30 वाजता ती ओटीच्या बाहेर आली होती. त्यानंतर मी त्याला तेव्हा भेटलो जेव्हा त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. संध्याकाळी 6-7 वाजता आम्ही सगळे घाबरलो होतो कारण ऑपरेशन थिएटरमध्ये काहीही अपडेट आली नाही कारण आम्ही इतकी गंभीर सर्जरी पाहिली नव्हती. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी मला आश्वासन केलं होतं की जर ते अपडेटसाठी बाहेर आले नाही, तर याचा अर्थ सर्जरी ठीक सुरु आहे आणि ती पूर्णपणे ठीक होईल.'
हेही वाचा : किडनी प्रत्यारोपणासाठी लाडक्या बहिणीच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; स्वत:सोबतच चार्टर्ड विमानानं मुंबईत आणलं
शोएबनं त्याच्या व्लॉगमध्ये ही माहिती देखील दिली की दीपिकाच्या पित्ताशयात देखील एक स्टोन होता. ज्या डॉक्टरांनी सर्जरी दरम्यान, काढण्याच आला आहे. शोएबनं सांगितलं की डॉक्टरांनी दीपिकाच्या पित्ताशयाला देखील काढलं कारण तिथे देखील स्टोन आहेत याविषयी कळलं, त्यामुळे त्यांनी लीवरचा एक छोटा भाग कापावा लागला कारण ट्यूमर कॅन्सरयुक्त होता. डॉक्टरांनी सांगितलं की 'लीवर हा स्वतःहून पुनरुज्जीवित होणारा अवयव आहे (तो कालांतराने स्वतःला बरा करतो). म्हणून आपण काळजी करण्याची गोष्ट नाही, परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि चांगली काळजी घेतली पाहिजे.'