Marathi News> मनोरंजन
Advertisement

'भविष्यात काय होणार हे अल्लाहलाच ठाऊक'; दीपिकाच्या स्टेज 2 लिवर कॅन्सरविषयी बोलताना पतीचा कंठ दाटला

Shoaib Ibrahim on Dipika Kakar : शोएबनं पत्नी दीपिकाच्या स्टेज 2 लिवर कॅन्सरविषयी दिली अपडेट... अल्लाहचा उल्लेख करत म्हणाला... 

'भविष्यात काय होणार हे अल्लाहलाच ठाऊक'; दीपिकाच्या स्टेज 2 लिवर कॅन्सरविषयी बोलताना पतीचा कंठ दाटला

Shoaib Ibrahim on Dipika Kakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शोएब इब्राहिमनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याची पत्नी दीपिका कक्कडच्या आरोग्याविषयी माहिती देताना दिसतोय. त्यानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यात त्यानं एक सांगितलं की दीपिकाला स्टेद 2 लिवर कॅन्सरविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. हे सगळं बोलताना शोएबला अश्रू अनावर झाले आणि स्वत: ला सावरत त्यानं सांगितलं की शोएबनं सांगितलं की त्याच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ होता तर दीपिकानं ती लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेल अशी आशा व्यक्त केली. 

दीपिका कक्कडनं सगळ्यात आधी सांगितलं की डॉक्टरांनी तिच्या लीवरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर असल्याचं सांगितलं. आता ती सर्जरीचा विचार करते. शोएबनं सांगितलं की स्कॅन रिपोर्टमुळे त्याला थोडं बरं वाटलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

रिपोर्ट्समध्ये चिंतेसारखं काही नाही!

त्यानं पुढे सांगितलं की 'अल्लाहच्या कृपेनं स्कॅन रिपोर्टमध्ये चिंता करण्यासारखं काही नाही. वायरल शरिराच्या दुसऱ्या भागात पसरत नाहीये. जे काही आहे, ते फक्त ट्यूमरपर्यंत मर्यादीत आहे आणि एकदा जेव्हा ट्यूमर काढण्यात येईल, तेव्हा सगळं काही ठीक होईल अशी आम्ही आशा करतोय. आतापर्यंत डॉक्टरांनी सांगितलं की सगळं काही कंट्रोलमध्ये आहे. पण अखेर, भविष्यात काय होणार हे अल्लाहलाच ठावूक.'

दीपिकाला असलेल्या सततच्या खोकल्यामुळे सर्जरी करण्यास ठोडा उशिर होतोय. पण शोएब म्हणाला, 'तरी सुद्धा, मला हे वाटतं की प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी अशा परिस्थितीतून जावं लागतं. आमच्यासाठी आतापर्यंत असलेला हा सगळ्या कठीण काळ आहे. तरी सुद्धा आम्ही अल्लाहचे तितकेच आभारी आहोत. पण यात कोणत्याही प्रकारे संशय नाही की आरोग्याविषयी ही चिंतेची मोठी बाब आहे. पण डॉक्टर नक्कीच हे सगळं सांभाळून घेतील. खरंतर, मी पूर्ण विश्वासानं हे सांगू शकतो की ती नक्कीच ठीक होणार.'

कॅन्सर हा शब्दच भयावह

दीपिका देखील शोएबसोबत दिसली, 'त्यावेळी तिनं सांगितलं की आमचा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे आम्हाला जरा बरं वाटतंय. नक्कीच, कोणाच्या ही जीवनात कॅन्सर हा शब्द भयावह आहे. रुग्ण आणि त्यांचं कुटुंब दोघांसाठी हे फार वाईट असतं. पण आम्ही मजबूत झालो आणि विश्वास ठेवून आहोत आणि सगळं चांगलंच होईल याची आशा आहे.' 

दीपिका आणि शोएब विषयी बोलायचं झालं तर त्या दोघांची भेट ही 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर झाली होती. तर दीपिकाला खरी ओळख देखील याच मालिकेतून मिळाली. याशिवाय दीपिका 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' मध्ये दिसली होती. तिनं काही हेल्थ प्रॉब्लमच्या कारणामुळे हा शो सोडला आहे. 

Read More