Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर दोन महिन्यातच बॉलिवूड स्टारच्या 'रासलीला', व्हॅनिटीमध्ये अभिनेत्रीसोबत.... पत्नीनं रंगेहाथ पकडताच बोंबाबोंब

Entertainment News : 'कितने अजीब रिश्ते हैं यहां पे... ' सेलिब्रिटी फोटोग्राफकरकडून पोलखोल... कोण आहे तो बडा अभिनेता? बी टाऊनमधील सर्वात मोठा गौप्यस्फोट....   

लग्नानंतर दोन महिन्यातच बॉलिवूड स्टारच्या 'रासलीला', व्हॅनिटीमध्ये अभिनेत्रीसोबत.... पत्नीनं रंगेहाथ पकडताच बोंबाबोंब

Entertainment News : नुकताच एक कमाल विवाहसोहळा संपूर्ण जगानं पाहिला. हा विवाहसोहळा भारतात पार पडला असला तरीही त्याची चर्चा मात्र सर्वदूर झाली. कारण, हा विवाहसोहळा होता अंबानींच्या धाकट्या चिरंजीवाचा म्हणजेच अनंत अंबानीचा. सेलिब्रिटींची मांदियाळी असणाऱ्या या लग्नसमारंभाच्या निमित्तानं Celebrity Weding तिथं असणारा लखलखाट आणि केला जाणारा तोबा खर्च पुन्हा एकदा सामान्य चाहत्यांचे डोळे दिपवून गेला. 

सेलिब्रिटींचे लग्नसोहळे म्हटलं की, या सोहळ्यांच्या छायाचित्रांची आणि व्हिडीओंचीसुद्धा तितकीच चर्चा होते. पण, काळजाचा ठाव घेणाऱ्या या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या फोटोतील प्रत्येक भावना खरी असते? एका सेलिब्रिटी वेडिंग फिल्मरनं सांगितलेल्या गोष्टी आणि केलेला गौप्यस्फोट पाहता हाच प्रश्न पडत आहे. 

'द वेडिंग फिल्मर' (The Wedding Filmer) च्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या विशाल पंजाबी यानं एका पॉडकास्ट शोमध्ये बी- टाऊनचा एक वेगळा चेहरा सर्वांसमोर आला. डीजे सिम्सच्या युट्यूब चॅनलवर मुलाखतीदरम्यान त्याला एक वेगळा प्रश्न विचारण्यात आला. 

'तू असं कोणतं लग्न कव्हर केलं आहेस का, की पुढं जाऊन ते नातं तुटलं?' या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देत विशालनं एका सेलिब्रिटी लग्नाचा नाव न घेता उल्लेख केला. जिथं लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यापासून 'तो' अभिनेता त्याच्या पत्नीचा विश्वासघात करत होता. एका बॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याला त्याच्याच पत्नीनं रंगेहाथ पकडलं होतं. व्हॅनिटी व्हॅनमध्ये पत्नी गेली आणि अभिनेत्याला विवस्त्र पाहून तिला धक्काच बसला... असं विशालनं सांगितलं. 

क्षणात गोष्टी बदलल्या... 

'द वेडिंग फिल्मर'च्या माहितीनुसार तो नवरदेवाला (अभिनेत्याला) फोन करत होता पण त्याच्या फोनला समोरून उत्तर मिळालं नाही. त्याच्या पत्नीनंही बोलण्यास नकार दिला. ज्यानंतर त्यानं अभिनेत्याच्या मॅनेजरशी संपर्क साधला आणि तिथून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची कुणकुण त्याला मिळाली. 'आम्हाला लग्नाचा व्हिडीओ नकोय...' असं समोरून सांगितलं जाताच 'आता काय मी तो नेटफ्लिक्सवर विकू....?' असा उपरोधिक प्रश्न या छायाचित्रकारानं केला. 

हेसुद्धा वाचा : पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री करणार भारतात काम? म्हणाली...

 

दोन महिन्यांतच नात्यांची समीकरणं बदलली.... 

लग्नाच्या वेळी हा अभिनेता नवरदेवाच्या रुपात असताना त्याच्या जोडीदाराला पाहून तो अभिनेता I love you वगैरे बोलत होता... रडून दाखवत होता. खोटेच अश्रू होते ते असं म्हणत हा अभिनेता कलाजगतातील एक मोठा सेलिब्रिटी असल्याचं म्हणत छायाचित्रकारानं त्याच्या या वागण्यावर निराशेचा सूर आळवला. आपल्याकडे असणाऱ्या व्हिडीओंची किंमत लाखोममध्ये असल्याचं सांगताना या सेलिब्रिटी वेडिंग फिल्मरनं त्या अभिनेत्याला उद्देशून 'तुला माहितीये तू कोण आहेस ते... ' अशा शब्दांत आव्हान दिलं.

Read More