Marathi News> मनोरंजन
Advertisement

NCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली

ड्रग्स कनेक्शनमधील धक्कादायक माहिती 

NCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरने 'या' गोष्टीची दिली कबुली

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घेत होता अशी कबुली श्रद्धा कपूरने दिलीय. कधी सेटवर तर कधी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुशांत ड्रग्ज घेत होता असं श्रद्धा कपूरने एनसीबीला सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. एनसीबीने श्रद्धा कपूरची कसून चौकशी केली. मात्र आपण स्वतः ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप श्रद्धा कपूरने फेटाळला आहे. पवना धरणात झालेल्या पार्टीची कबुलीही श्रद्धाने चौकशीत दिल्याची माहिती आहे. मात्र तिथे आपण ड्रग्ज सेवन केलं नाही असं श्रद्धाने म्हटलंय. मात्र जया साहाशी झालेल्या सीबीडी ऑईलबाबतच्या व्हॉट्सअप चॅटबाबत तिने नकार दिला आहे. 

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी सीबीआयने दुसरा मेडीकल बोर्ड स्थापन करावा अशी मागणी रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली आहे. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच निष्कर्ष काढण्याचा दबाव सीबीआयसह तपास यंत्रणांवर आहे. केवळ फोटोंच्या आधारे निर्णयाप्रत येणं धोकादायक आहे. 

ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे. एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.

२०१७ चे 'ते ' व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण ऍडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचंही समोर येत आहे. 

Read More