Marathi News> मनोरंजन
Advertisement

नव्या प्रवासासाठी श्रद्धा कपूर सोडणार राहतं घर; आता पत्ता असेल...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मात्र, या सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा कपूरने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ती आता अक्षय कुमारच्या शेजारी राहायला जाणार आहे. नक्की हे काय प्रकरण आहे जाणून घेऊया.

नव्या प्रवासासाठी श्रद्धा कपूर सोडणार राहतं घर; आता पत्ता असेल...

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या घराविषयी आता एक नवी बातमी समोर आली आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या अहवालानुसार, ती आता जुहूमध्ये स्थित असलेल्या हृतिक रोशनच्या सी-फेसिंग घरात भाडेतत्वावर राहायला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. हृतिकच्या शेजारीच अक्षय कुमार त्यांच्या कुटुंबासोबत राहतो.

वरुण धवनचा व्यवहार फिस्कटला म्हणून कदाचित श्रद्धा...

वरुण धवन त्याची पत्नी नताशा दलाल आणि त्याची लेक हृतिकच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही किंवा त्यांची जी डील होती ती होऊ शकली नाही. त्यात आता श्रद्धा तिथे शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा: बंगला विकून खरेदी केलं ऑफिस? कंगना राणौतला या डीलमधून किती कोटींचा फायदा झाला? आकडा पाहाच

श्रद्धाला कुटुंब म्हणतयं तुला आता स्वत:च घर घ्यायला हवं...

'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धानं तिच्या कुटुंबाविषयीदेखील भाष्य केलं. यामध्ये बोलताना ती म्हणाली की 37 वर्षांची होऊनसुद्धा ती आई-वडिलांसोबत एकाच घरात राहते. तिला तिच्या कुंटुंबाने अनेकवेळा तुला आता स्वत:च घर घ्यायला हवं अस सांगितल परंतु तिला त्यांच्यासोबत राहणं पसंत असल्याचं तिनं सांगितलं.

दरम्यान, या आधी श्रद्धा कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. त्याचं कारण म्हणजे श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राहुल मोदीसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ते अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र स्पॉट झाले होते. राहुल मोदीविषयी बोलायचं झालं तर तो 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचा लेखक होता. तर याच चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. आधी त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं. या सगळ्यात त्या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं हे कोणालाही कळलं नाही. अचानक श्रद्धानं राहुल मोदीला इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केलं.

Read More