Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shraddha Murder Case: 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती

Shraddha Murder Case: या अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Shraddha Murder Case: 'दीया और बाती हम'  फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती

मुंबई : 'दीया और बाती हम' (Diya Aur Baati Hum) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील अभिनेत्री कनिष्का सोनी (kanishka soni) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कनिष्कानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धा हत्याकांडाच्या बऱ्याच गोष्टी तिच्यासोबत घडल्याचे तिने म्हटले आहे. मृत्यूपूर्वी श्रद्धासोबत जे काही घडलं ते सर्व स्वतः देखील तिनं अनुभवलं आहे. कनिष्काने स्वतःचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये तिनं सांगितलं की, श्रद्धाच्या मृत्यूनं तिला खूप दु:ख झाले आहे. कनिष्काने नाव न सांगता एका अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.

कनिष्क लिव्ह-इनमध्ये राहू लागली तेव्हा काय झालं? 

कनिष्कानं व्हिडिओमध्ये म्हटले की ती श्रद्धाच्या कथेचे तिच्या आयुष्याशी साम्य आहे,  एका अभिनेत्यानं तिला प्रपोज केलं होतं आणि तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं होतं. कनिष्कानं सांगितले की, त्या अभिनेत्याच्या सवयी वाईट होत्या आणि तो हिंसक स्वभावाचा होता. इतकंच नाही तर तो दारू प्यायचा आणि रागाच्या भरात काहीही करायचा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सर्व गोष्टी असूनही कनिष्काने त्याच्यासोबत राहण्याचे ठरवले आणि कदाचित त्याच्यात बदल घडेल असे तिला वाटले. कनिष्कानं सांगितलं की, 'ती बहुतेक वेळ त्या अभिनेत्याच्या घरी राहायला लागली, पण नंतर या व्यक्तीन तिला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा आग्रह करण्यास सुरुवात केली. ती त्याच्यासोबत राहू लागली, पण एके दिवशी त्यानं लग्नाबद्दल विचारले तेव्हा आश्चर्य वाटले.'

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीचं Brain Stroke नं निधन!

या व्यक्तीनं कनिष्कला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कनिष्कानं सांगितलं की, तिला भीती होती की हा व्यक्ती कधीही तिचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे त्याच रात्री तिनं तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. कनिष्का त्याच रात्री सामान बांधून पळून गेली आणि तेव्हापासून तिनं या व्यक्तीपासून अंतर ठेवले होते.

Read More