Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून श्रद्ध कपूरनं हात जोडून दिला नकार, व्हिडीओ

श्रद्धा कपूरनं कोणाला आणि का दिला नकार 

...म्हणून श्रद्ध कपूरनं हात जोडून दिला नकार, व्हिडीओ

मुंबई: श्रद्धा कपूर कायमच आपल्या वेगळ्या आणि हटके लूक किंवा डान्समुळे चर्चेत असते. मात्र सध्या तिचा एक व्हिडीओ खूप जास्त चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिने दिलेल्या नकारामुळे.  या व्हिडीओमध्ये श्रद्धा नकार देत असून हात जोडताना देखील दिसली आहे.

श्रद्धाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात . पण यावेळी श्रद्धा एका आगळ्या वेगळ्या व्हिडीओमुळे  चर्चेचा विषय झाली आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा नकार दर्शवत हात जोडून निघून जातांना दिसत आहेत. असं नेमक काय घडले ज्यामुळे श्रद्धाला चक्क हात जोडून पळ काढावा लागला आहे.
 
या  व्हायरल  व्हिडीओमध्ये श्रद्धा पांढर्‍या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा पॅन्टमध्ये  दिसत आहे.  श्रद्धाने या लूकला ब्लॅक बॅग, सन ग्लासेस आणि मास्क सह कम्पलीट केलं आहे. श्रद्धाच्या व्हायरल होणाऱ्या या  व्हिडीओला चाहत्यांकडून जोरदार पसंत मिळत आहे.  

होळीनिमित्तान अनेक मुलं श्रद्धाला रंगवण्यासाठी येत असताना श्रद्धानं त्यांना नकार दिला. या व्हिडिओमध्ये  छोटी मुलं रंगाच्या पाण्यानं भरलेले फुगे घेऊन श्रद्धाच्या मागे पळत आहेत तर श्रद्धा कपूर त्यांना नकार देऊन तिथून पळ काढत असल्याचं पाहायला मिळालं आहे. श्रद्धाचा नकार ऐकुन  मुलांनी श्रद्धा बरोबर सहमती दर्शवली.

श्रद्धा कपुर कायमच सोशल मीडियावर (Social Media) अ‍ॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे 60 million च्या जवळपास फॉलोअर्स (Followers) आहेत. श्रद्धा तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया पेज वरून देताना दिसते.  काही दिवसापुर्वीच  श्रद्धाचे तिच्या कझिनच्या लग्नानातले फोटो चाहत्यांसोबत शेअर करताच ते वेगानं व्हायरल झाले होते.  

Read More