मुंबई : हल्ली सेलेब्सबरोबर त्यांची मुलं देखील लोकप्रिय होताना आपण पाहतो. हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये सर्वाधिक असला तरीही मराठी कलाकार देखील काही मागे राहिले नाहीत. मराठी कलाकार देखील आता सोशल मीडियावर आपल्या मुलांचे फोटो शेअर करताना दिसतात.
नुकताच डॉटर्स डे साजरा झाला. तेव्हा अनेकांनी आपल्या मुलींसोबत फोटो शेअर केले असतील. असाच एक फोटो अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या मुलीसोबत शेअर केला असून तिला डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत श्रेयस, त्याची पत्नी दीप्ती आणि गोंडस, निरागस मुलगी आद्या दिसत आहे. प्रत्येक बाप आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो हे त्याच्या फोटोंमधून दिसत आहे.
If you find yourself spinning...you certainly have a daughter. Cause daughters have this special knack of spinning you around their little fingers. Happy #DaughtersDay
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) September 22, 2019
Aadyapic.twitter.com/BLuaYzDpzG
श्रेयसने शेअर केलेल्या प्रत्येक फोटो त्याच आद्यावर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. श्रेयस हा कलाकार म्हणून जितका चांगला आहे तितकाच तो एक बाबा म्हणून चांगला असेल यात शंकाच नाही. श्रेयसच्या या फोटोवर अभिनेत्री सेलिना जेटलीने देखील कमेंट केली आहे.
श्रेयस आणि दीप्ती हे चांगले मित्र... 13 वर्षांपूर्वी हे दोघं विवाहबंधनात अडकले. श्रेयस आणि दीप्तीने सरोगसीच्या माध्यमातून पालकत्व स्विकारलं आहे. आद्या असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिओनी, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान यांना देखील सरोगसीद्वारे बाळाचा स्विकार केला आहे.
मराठी मालिकांमधून श्रेयसने आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर मराठी सिनेमे आणि आता बॉलिवूडमध्ये देखील श्रेयसने आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. 2005 मधील 'इक्बाल' सिनेमानंतर श्रेयसची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली.