Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हायरल सत्य: श्वेता तिवारीच्या मुलीचं छोट्या पडद्यावर पदार्पण?

पलक कोणत्याही टीव्ही सिरीयलमधून डेब्यू करत नसल्याचं श्वेताने सांगितलं.

 व्हायरल सत्य: श्वेता तिवारीच्या मुलीचं छोट्या पडद्यावर पदार्पण?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांची मुलं चित्रपटांमधून, सिरियल्यमधून छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक हीनेही डेब्यू केल्याची माहिती समोर आली. पलक लवकरच छोट्या पडद्यावरून आपल्या करियरची सुरूवात करणार असल्याची चर्चा होती. परंतु या चर्चेने श्वेता चांगलीच नाराज झाली आहे. या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावरून चर्चेत आहे. सोशल मीडियावर पलकच्या चाहत्यांची मोठी लिस्टच आहे. अशातच तिच्या डेब्यूच्या चर्चा होताना दिसत आहेत. परंतु यात कोणतंही तथ्य नसल्याचे सांगत तिने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

fallbacks

fallbacks

पलक शहीर शेख आणि रिया शर्मा यांच्या आगामी 'ये रिश्ते है प्यार के' या टीव्ही सिरीयलमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. परंतु श्वेता तिवारीने सोशल मीडियावर या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. पलक कोणत्याही टीव्ही सिरीयलमधून डेब्यू करत नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 

fallbacks

'ये रिश्ते है प्यार के' ही आगामी सिरीयल आधीच्या 'ये रिश्ता क्या केहलाता है' सिरीयलचा स्पिन ऑफ आहे. काही दिवसांपूर्वीच या सिरीयलबाबत घोषणा करण्यात आली होती. या सिरीयलच्या कास्टिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Read More