Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्वेता तिवारीच्या मुलीसमोर या सिंगरने केलं असं काही की...

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. 

श्वेता तिवारीच्या मुलीसमोर या सिंगरने केलं असं काही की...

मुंबई :  टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता-गायक हार्डी संधूसोबतची तिची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. दरम्यान, पलक तिवारीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हार्डी संधूसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हार्दिकचा डान्स पाहून पलक हसली
खरंतर हा व्हिडिओ 'बिजली बिजली' गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा आहे. गाण्याचं शूटिंग सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका खोलीत कॅमेरे बसवले आहेत. पलक तिवारी खोलीत शिरली आणि टेबलावर बसली. त्यानंतर हार्डी संधू येतो. तो शर्टलेस आहे आणि पलक तिवारीसमोर 'बिजली बिजली' गाणं गाताना अचानक नाचू लागतो. हार्डी संधूची ही फनी स्टाइल पाहून पलक हसू लागते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पलक तिवारीने शेयर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ पलक तिवारीने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, हे मजेदार नाही का? या व्हिडिओला प्रचंड लाइक मिळतायेत त्याचबरोबर हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर केला जात आहे. चाहते व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 38 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते.

Read More