Marathi News> मनोरंजन
Advertisement

Palak Tiwari चा बोल्ड लुक आला समोर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

पुन्हा बोल्डनेसची चर्चा, पलक तिवारीच हे फोटो पाहिलेत का? चाहते झालेत घायाळ

Palak Tiwari चा बोल्ड लुक आला समोर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

मुंबई : टीव्ही कलाकार श्वेता तिवारी हीची मुलगी पलक तिवारी सध्या खुप चर्चेत असते. म्य़ुझिक व्हिडिओत झळकल्यानंतर आता बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणाची प्रेक्षक वाट पाहत असतात. मात्र पदार्पण अद्याप झालं नसलं तरी ती चर्चेच्या केंद्रस्थानी असते. यावेळी निमित्त आहे तिच्या बोल्ड फोटोजचे. या फोटोत नेमक काय आहे ते जाणून घेऊयात.  

'बिजली-बिजली' या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आलेली पलक तिवारी ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय. मात्र अद्याप तरी तिचं बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला नाही आहे. मात्र हा प्रवेश झाला नसला तरी ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. आता पुन्हा एकदा तिने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

लुकची एकचं चर्चा 

पलक तिवारीने नवीन फोटोंमध्ये काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर जंपसूट घातला आहे. या ग्लॅमरस आउटफिटसह ओपन हेअरस्टाईल लूक ठेवला आहे आणि काळी हँडबॅगही कॅरी केली आहे.पलक या फोटोंमध्ये बॅकलेस लूक देत वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.सोशल मीडियावर पलकच्या फोटोला लाखो लाईक्स आणि कमेंटस् मिळता आहेत.  

fallbacks

पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही काळापूर्वी तिचा 'बिजली-बिजली' हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत ती तिच्या आईपेक्षा कमी नाही असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं नसलं तरी अवघ्या 21 वर्षांची पलक इंडस्ट्रीतील इतर अभिनेत्रींना स्पर्धा देताना दिसतेय. 

fallbacks

 

Read More