Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

श्वेता तिवारीच्या टीमने दिली महत्वाची माहिती 

श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही कामात अतिशय व्यस्त आहे. यामुळे तिची तब्बेत आता अचानक बिघडली आहे. यामुळे श्वेता तिवारीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील रूग्णालयात श्वेता तिवारीला दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. 

श्वेता तिवारी नुकतील लोकप्रिय रिऍलिटी शो 'खतरों के खिलाडी 11' मध्ये दिसली होती. मीडिया रिपोर्टनुसार, श्वेता तिवारी लवकरच 'बिग बॉस 15' मध्ये दिसणार आहे. 

श्वेता तिवारीच्या आरोग्याची अपडेट 

श्वेताच्या टिमने सांगितलं की, आता तिची तब्बेत बरी आहे. अशक्तपणा आणि ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता तिच्या तब्बेतीत सुधारणा आहे. अनेकांनी श्वेता तिवारीच्या तब्बेतीबाबत विचारणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी सततचा प्रवास करत आहे. त्यामुळे तिची तब्बेत बिङडली आहे. प्रवासातून अशक्तपणा आला असून तीचा ब्लड प्रेशर देखील लो झाला आहे. 

तसेच वातावरणातील बदलाचा श्वेताच्या तब्बेतीवर परिणाम झाला आहे. सध्या श्वेता आराम करत आहे. चाहत्यांनी तिच्या प्रकृती स्वास्थाबद्दल प्रार्थना करावी. श्वेता आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. आतापर्यंत तिने आपल्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे. पण यशस्वी अभिनेत्री म्हणून ती लोकप्रिय आहे. 

सोशल मीडियावर श्वेता तिवारी खूप ऍक्टिव आहे. अनेकदा ती आपले खास आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. वयाची चाळीशी गाठली असली तरीही श्वेता तिवारीचा बोल्डनेस काही कमी नाही. तिला दोन मुले आहेत. 

Read More