Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री श्वेता तिवारी हॉस्पिटलमध्ये भरती

 अभिनेत्री श्वेता तिवारी अलीकडेच खतरों के खिलाडी 11 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.

अभिनेत्री श्वेता तिवारी हॉस्पिटलमध्ये भरती

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी अलीकडेच खतरों के खिलाडी 11 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अशा बातम्या बाहेर येत आहेत की ती बिग बॉस 15च्या घरात प्रवेश करताना दिसू शकते. अभिनेत्रीला सध्या मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अलीकडेच श्वेताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पुस्तक वाचताना एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना तिच्या हातात सलाईननची पट्टी दिसली. त्यानंतर चाहत्यांनी आपली चिंता व्यक्त करायला सुरुवात केली आणि फोटो होतायेत व्हायरल.

मीडिया रिपोर्टनुसार, काळजी करण्यासारखं काहीच नाही. श्वेता ठीक आहे. श्वेताला अशक्तपणा आणि हवामानातील बदलामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खरं तर, तिच्या टीमने एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे ज्यात म्हटलं आहे की, 'आम्हाला श्वेता तिवारीच्या प्रकृतीबद्दल बरेच कॉल आणि मॅसेज येत आहेत. श्वेता तिवारीला अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती लवकरच सावरत आहे आणि ती लवकरच घरी बरी होवून परत येईल.

fallbacks

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हे आज प्रत्येक घरातील एक प्रसिद्ध नाव आहे. श्वेता रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 11' मध्येही दिसली होती. श्वेता तिवारीचं नाव आज छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Read More