Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने गोव्यात केलं लग्न, पाहा फोटोज

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठी तिचा रॅपर बॉयफ्रेंड चैतन्य शर्मासोबत विवाहबद्ध झाली. 

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने गोव्यात केलं लग्न, पाहा फोटोज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठी तिचा रॅपर बॉयफ्रेंड चैतन्य शर्मासोबत विवाहबद्ध झाली. शुक्रवारी गोव्यात पारंपारिक पद्धतीने श्वेता आणि चैतन्य यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यात श्वेताने लाल आणि मिंट रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. 

fallbacks

श्वेताने मसान आणि हरामखोर सिनेमात काम केले आहे. विवाहसोहळ्यात श्वेताने पापा डोन्ट प्रीचचा डिजाईनर लहेंगा परिधान केला होता. त्यात ती अत्यंत सुंदर दिसत होती.

fallbacks

तर चैतन्यने मरुन रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता. हिंदू रितीरिवाजात हा विवाह पार पडला.

fallbacks

चैतन्य शर्मा, ज्याचे स्टेजवरील नाव स्लोचीता आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी श्वेताला लग्नासाठी प्रपोज केले होते. मुंबईतील चुक्कू क्लबमध्ये चैतन्यने श्वेताला लग्नाची मागणी घातली. आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.

fallbacks

श्वेता त्रिपाठीने सिनेमाशिवाय वेब सिरीजमध्येही काम केले आहे. मिर्जापूर या वेब सिरीजमध्ये तिने काम केले आहे. त्याचबरोबर चैतन्य शर्मा, रणवीर सिंग यांच्यासोबत गलीबॉयमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

fallbacks

लग्नसोहळ्यात आपल्या आईसोबत श्वेता त्रिपाठी. 

fallbacks

 

Read More