Marathi News> मनोरंजन
Advertisement

रेव्ह पार्टीत कसा अडकला शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत? त्या पार्टीबद्दल जाणून घ्या माहिती

सिद्धांत कपूरला एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीदरम्यान अंमली पदार्थ (Narcotics) सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

रेव्ह पार्टीत कसा अडकला शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत? त्या पार्टीबद्दल जाणून घ्या माहिती

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सिद्धांत कपूरला एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीदरम्यान अंमली पदार्थ (Narcotics) सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

पोलिस उपायुक्त डॉ. भीमाशंकर एस गुलेद म्हणाले, ''बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याने ड्रग्ज घेतल्याची पुष्टी झाली आहे. त्याच्या रक्त तपासणी अहवालात तो ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले. त्याला उलसूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे."

पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री एमजी रोडवरील एका पॉश हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. 37 वर्षीय सिद्धांत कपूरसह अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. असे पोलिस सूत्रांनी सांगितलं. कपूरने 'शूटआउट अॅट वडाळा' आणि 'अग्ली' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर  'ढोल'  सारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

ड्रग्जच्या गैरवापराची पुष्टी
या रेव्ह पार्टीत जवळपास 35 लोकं उपस्थित होते आणि सिद्धांत कपूरलाही पार्टीत बोलावण्यात आलं होतं. सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावासह पाच जणांनी ड्रग्ज घेतल्याची पुष्टी झाली आहे.

पोलिसांनी पार्टीकडून सात 'एक्स्टसी' गोळ्या आणि गांजाची पाकीटही जप्त केली. आरोपींवर ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या कलम 22A, 22B आणि 27B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2020 मध्ये कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या एका विभागात पोलिसांनी अंमली पदार्थांचे सेवन उघड केलं होतं. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी आणि माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा यांना अटक केली.

Read More