Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गुलाबजाम' चित्रपटाचा टीझर रसिकांच्या भेटीला

पदार्थ बनवताना तुमच्या मनातील भावना पदार्थांमध्ये उतरतात. त्यामुळेच एखाद्या पदार्थासाठी असणारे जिन्नस सारखेच असले तरीही प्रत्येकाने बनवलेल्या पदार्थाची चव बदलते.  

'गुलाबजाम' चित्रपटाचा टीझर रसिकांच्या भेटीला

मुंबई  : पदार्थ बनवताना तुमच्या मनातील भावना पदार्थांमध्ये उतरतात. त्यामुळेच एखाद्या पदार्थासाठी असणारे जिन्नस सारखेच असले तरीही प्रत्येकाने बनवलेल्या पदार्थाची चव बदलते.  

स्वयंपाकशास्त्राचा हा नियम अनेकांना ठाऊक असेल. याच नियमावर आधारित एका चित्रपट बनवण्याचं धाडस दिग्दर्शक सचिन कुंडलकरने केला आहे.  

टीझर झाला प्रदर्शित  

झी स्टुडिओ आणि गो मोशन पिक्चरचा 'गुलाबजाम' हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत आहे. या दोघांचाही लूक टीझरमध्ये दाखवण्यात आलेला नाही.   


काय आहे कहाणी ? 

सिद्धार्थ परदेशातून भारतामध्ये मराठी पदार्थ शिकायला येतो. दरम्यान त्याची भेट सोनालीशी होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीतून उलगडणारा प्रवास पाहण्यासारखा ठरणार आहे. 

Read More