Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिद्धार्थ मल्होत्राचा मॉडेलसोबतचा व्हिडीओ पाहून चाहते भडकले, म्हणाले कियारा...

सिद्धार्थ मल्होत्राचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​रॅम्पवर चालत आहे आणि एक मॉडेल त्याच्या जवळ जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. 

सिद्धार्थ मल्होत्राचा मॉडेलसोबतचा व्हिडीओ पाहून चाहते भडकले, म्हणाले कियारा...

Sidharth Malhotra Video: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने शुक्रवारी दिल्लीमधील एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. ज्यामध्ये एक मॉडेल सिद्धार्थ मल्होत्राच्या जवळ जाताना दिसत आहे. अभिनेत्याने देखील या व्हिडीओमध्ये मॉडेलसोबत वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. सध्या सिद्धार्थ मल्होत्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. 

व्हिडीओमध्ये मॉडेल सिद्धार्थ मल्होत्राकडे जाते आणि त्याची कॉलर ओढते. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि वेगवेगळ्या पोज देऊ लागतात. Black Tuxedo मध्ये सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत आहे. त्याच वेळी, मॉडेल देखील चमकदार गाऊनमध्ये अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे. 

व्हिडीओवर मजेशीर कमेंट

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, कियारा भाभीला सांगावे लागेल. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, आज सिद्धार्थ घरी गेल्यावर मारहाण होणार. अशा वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी सिद्धार्थ मल्होत्रा व्हिडीओवर केल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मॉडेलने मागितली माफी

सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडेल एलिसिया कौरने प्रतिक्रिया दिली आहे. एलिसिया कौरने कियारा आडवाणीची माफी मागितली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ शेअर केला आणि व्हिडीओसोबत तिने सॉरी कियारा असा हॅशटॅग लिलिला आहे. 

fallbacks

Read More