Marathi News> मनोरंजन
Advertisement

आई होण्याआधीच कियारा आडवाणीला सिद्धार्थनं गिफ्ट केली लग्झरी गाडी; कोटींच्या घरात आहे किंमत

Sidharth Malhotra Gift Luxury Car : सिद्धार्थ मल्होत्रानं कियारा आडवाणीला भेट केली लग्झरी कार

आई होण्याआधीच कियारा आडवाणीला सिद्धार्थनं गिफ्ट केली लग्झरी गाडी; कोटींच्या घरात आहे किंमत

Sidharth Malhotra Gift Luxury Car : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आई-बाबा होणार आहेत. दोघं त्यांच्या होणाऱ्या बाळासोबत आयुष्याच्या नव्या जर्नीची सुरुवात करण्यासाठी उत्साही आहेत. आता आई होणाऱ्या सिद्धार्थनं कियाराला एक खास भेट वस्तू दिली आहे. खरंतर, सिद्धार्थनं मॉम टू बी कियाराला लग्झरी कार गिफ्ट केली ज्याची किंमत ही कोटींच्या घरात आहे. 

गाडीची किंमत 

सिद्धार्थनं कियाराला जी कार गिफ्ट केली आहे. त्या कारची किंमत ही टॉयोटा वेलफायरची आहे. ही कार फक्त काहीच कलाकारांकडे आहे. या कलाकारांच्या यादीत अजय देवगण, अनिल कपूर, ऐश्वर्या राय, क्रिती सेनन, अक्षय कुमार आणि आमिर खान हे कलाकार आहे. या गाडीची किंमत ही 1.12 कोटी आहे. दरम्यान, याशिवाय सिद्धार्थ आणि कियाराकडे बऱ्याच लग्झरीयस गाड्यांचं कलेक्शन आहे. तर ते दोघेही लग्झरी आयुष्य जगतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

7 फेब्रुवारी 2023 रोजी कियारा आणि सिद्धार्थनं लग्न केलं. त्यांच्या लग्नात कुटुंबातील लोकं आणि काही जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. तर 28 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी प्रेग्नेंसीची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी भेट वस्तू येणार आहे.  

हेही वाचा : एआर रहमानला दिल्ली हायकोर्टानकडून कोट्यावधींचा दंड; 'वीरा राजा वीरा' च्या कॉपीराइटचा आरोप

दरम्यान, आता सिद्धार्थ आणि कियाराच्या प्रोफेशनल लाइफ विषयी बोलायचं झालं तर सिद्धार्थ आता परम सुंदरी या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. कियाराविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी गेम चेंजर या चित्रपटात दिसली. तर तिनं काही दिवसांपूर्वीच वॉर या चित्रपटाचं शूटिंग संपवलं आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कियारासोबत हृतिक रोशल आणि ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Read More