Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आलियाला Kiss करणं म्हणजे...', Ex-Boyfriend च्या वक्तव्यानंतर खळबळ

आलियाला किस केल्यानंतर Ex-Boyfriend म्हणतो...   

'आलियाला Kiss करणं म्हणजे...', Ex-Boyfriend च्या वक्तव्यानंतर खळबळ

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे तुफान चर्चेत आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आलियावर इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करण्याआधी आलिया अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून आलिया आणि सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमातील आलिया आणि सिद्धार्थचा एक किसिंग सीन देखील तुफान व्हायरल झाला. किसिंग सीनबद्दल सिद्धार्थला  'फिल्मफेयर'मध्ये विचारण्यात देखील आलं होतं.

तेव्हा आलियाला किस करणं फार बोरिंग असल्याचं सिद्धार्थने सांगितलं होत. सिद्धार्थला ऑनस्क्रिन कोणत्या अभिनेत्रीला किस करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नाचं उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, 'मला दीपिका पादुकोणला किस करायला आवडेल. ऑनस्क्रिन आलियाला किस करुन आता कंटाळलो आहे.' असं देखील सिद्धार्थ म्हणाला होता.

सिद्धार्थच्या या वक्तव्यानंतर आलिया आणि त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. पण दोघांचं रिलेशनशिप जास्त काळ काही टिकू शकलं नाही. अखेर त्यांचं ब्रेकअप झालं. 

आता सिद्धार्थ अभिनेत्री किआरा आडवाणीला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र देखील स्पॉट करण्यात येत. सिद्धार्थच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरचं 'मिशन मजनू', 'थँक गॉड' आणि 'योद्धा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

Read More