Marathi News> मनोरंजन
Advertisement

Break-up नंतर सिद्धार्थ मल्होत्रा नाराज... फोटो शेअर करत म्हणाला...

सिद्धार्थ - कियाराचं ब्रेकअप...  मार्ग वेगळे झाल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी...    

Break-up नंतर सिद्धार्थ मल्होत्रा नाराज... फोटो शेअर करत म्हणाला...

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणीचं  ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ एका कारणामुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण आहे ते म्हणजे.. अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत असलेलं सिद्धार्थचं नातं. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या. 'शेरशाह' सिनेमातील त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण आता दोघांचे  मार्ग वेगळे झाले असल्याचं समोर येत आहे. 

ब्रेकअपनंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. स्वतःचा फोटो शेअर करत त्याने, कॅप्शनमध्ये, 'सूर्यप्रकाशाशिवाय दिवस कसा असेल, तुम्हाला माहिती आहे... रात्र...' असं लिहिलं आहे.  सध्या सिद्धार्थची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थच्या पोस्टनंतर, ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये वाद सुरू आहे. दोघे आता एकमेकांना भेटत देखील नसल्याचं समोर आलं आहे. कियारा - सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या चर्चांनी चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. 

सिद्धार्थ आणि कियारा यांचे एकमेकांशी चांगले बाँडिंग आहे. एवढंच नाही तर, दोघेही लग्न करू शकतात असं देखील कळत होतं. पण दोघांमध्ये असं काय घडलं, ज्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे अद्याप कळू न शकल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. 

Read More