Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sidharth Shukla Postmortem Report : सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्टकडे चाहत्यांचं लक्ष 

Sidharth Shukla Postmortem Report : सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट डॉक्टरांनी दिला आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या प्राथमिक पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण दिलेले नाही. मात्र अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्ल्याच्या अकाली निधनामुळे चाहत्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 

केमिकल एनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या दोन रिपोर्टमधून कळू शकेल मृत्यूचे कारण नेमकं काय आहे. प्राथमिकदृष्ट्या तरी अनैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे दिसत नसल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे. 

सिद्धार्थ शुक्लाने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक गोळी घेतली होती. ती गोळी नेमकी कशासंदर्भात होती. याबद्दल कोणती माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे केमिकल एनालिसिस व हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टमध्ये समजू शकेल की विष किंवा ड्रग्ज घेतले होते का ते? यामधून समोर येईल. 

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज सकाळी अकरा वाजता त्याचं पार्थिव कुटुंबाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर अंधेरी इथल्या घरी त्याचं पार्थिव आणण्यात येणार आहे. सिद्धार्थ शुक्लावर ब्रम्हकुमारीपद्धतीने काही विधी करण्यात येणार आहेत. या विधी सिद्धार्थ शुक्लाच्या घरी होणार आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि त्याची आई रिटा ब्रम्हकुमारी यांचे अनुयायी होते. तेथील मंडळींना देखील सिद्धार्थ शुक्लाचा हा मोठा धक्का आहे. 

Read More