The Great Indian Kapil Show 3: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सिद्धू हे अर्चना पूरण सिंगसोबत 'जज' च्या खुर्चीवर दिसणार आहेत. काही वर्षांपूर्वी शोमधून अचानक गायब झाल्यानंतर सिद्धूपाजी परत येणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगत होती. आता ती प्रत्यक्षात उतरली आहे.
यंदाच्या सीझनमध्ये केवळ जुने चेहरे नव्हे, तर अनेक क्रिकेटपटू आणि नव्या पाहुण्या कलाकारांची उपस्थिती शोमध्ये उत्सुकता वाढवणारी ठरत आहे. शोचे प्रोमो आणि सिद्धू यांनी पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि चाहत्यांकडून 'शोमध्ये जुनी मजा पुन्हा येणार!' अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
सिद्धू यांचा 'सिद्ध' अंदाज
नवजोत सिंग सिद्धू त्यांच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. वाक्यरचना आणि शेरोशायरी हे त्यांचं ट्रेडमार्क बनलं आहे. त्यांची कपिलसोबतची जुगलबंदी प्रेक्षकांना पुन्हा जुन्या दिवसांची आठवण करून देणार, यात शंका नाही.
सिद्धूंच मानधन सर्वाधिक?
सिद्धू यांनी मागील काळात 125 एपिसोडसाठी 25 कोटी रुपये घेतले होते आणि आता त्यांचं मानधन 30 ते 40 लाख रुपये प्रति एपिसोड इतकं झालं आहे. हे मानधन सुनील ग्रोव्हरच्या 25 लाखांपेक्षा अधिक आहे. यावरून स्पष्ट होतं की निर्मात्यांना सिद्धू यांचा 'कमबॅक' प्रेक्षकांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा वाटतो.
इतर कलाकारांचं मानधन:
1. कपिल शर्मा- ₹5 कोटी प्रति एपिसोड
2. नवजोत सिंग सिद्धू- ₹30-40 लाख
3. सुनील ग्रोव्हर- ₹25 लाख
4. अर्चना पूरण सिंग- ₹10 लाख
5. कृष्णा अभिषेक- ₹10 लाख
6. किकू शारदा- ₹7 लाख
7. राजीव ठाकूर- ₹6 लाख
चाहते का म्हणत आहेत: 'ओल्ड इज गोल्ड!'
सिद्धू पुन्हा शोमध्ये दिसणार याचा आनंद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जात आहे. काहींनी तर म्हटलं आहे की, 'सिद्धूपाजी आले म्हणजे खरी धमाल सुरू होणार!' तर काही नेटकऱ्यांनी अर्चना आणि सिद्धू यांची एकत्र जुगलबंदी पाहायला मिळणार याबद्दलही उत्सुकता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा: Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतला घरी 'या' नावाने मारायचे हाक; पाहा त्याची टोपण नावे
नेटफ्लिक्सवर 'हसण्याची तयारी'
या सीझनमध्ये शो पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच नेटफ्लिक्सवर प्रसारित होतोय. त्यामुळे त्याचा दर्जा, संकल्पना आणि मेहमान यामध्ये बदल अपेक्षित आहेत. ग्लोबल प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी शोचं प्रेझेंटेशन अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणार असल्याची शक्यता आहे.