Sikandar Advance Booking : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी 'सिकंदर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. तर मंगळवारी 'सिकंदर' ची प्री-सेल्स बुकिंग सुरु होणार आहे आणि गुरुवारी दुपारपर्यंत दोन दिवसात चित्रपटाचे 1 लाख पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. खरंतर, सलमानच्या चित्रपटासाठी असलेल्या या आगाऊ बूकिंगची संख्या ही थोडी कमी आहे. पण आशा आहे की अखेरच्या दोन दिवसात शुक्रवारी आणि शनिवारी बूकिंगची संख्या वाढू शकते. पण या सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सलमान खान या आधी त्याचा प्रदर्शित झालेला 'टायगर 3' च्या अगाऊ बूकिंगला मागे टाकणार का?
सलमान खानचा जो कोणताही चित्रपट हा ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झाला त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. पण 'सिकंदर' च्या आगाऊ बूकिंगचा वेग पाहता सलमानची क्रेझ कमी झाल्याची चिंता त्यांच्या चाहत्यांमध्ये दिसून आली आहे. Sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, 'सिकंदर' साठी आतापर्यंत 1 लाख 2 हजार 304 तिकिटांचं आगाऊ बूकिंग करण्यात आलं. IMAX च्या शो देखील सहभागी आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत 11,167 शोचे प्री-सेल्स बूकिंग होतेय. तर 25 मार्चला आगाऊ बूकिंगच्या पहिल्या दिवशी जवळपास 4 हजार शोज आणि बुधवारी 27 मार्चच्या संध्याकाळी 8.5 हजार शोज साठी बूकिंग सुरु आहे.
गेल्या दोन दिवसात ओपनिंग डेसाठी आगाऊ बूकिंगसाठी 'सिकंदर' 2.91 कोटी ग्रॉस कलेक्शन केलं. जेव्हा रिझर्व तिकिटांची एकूण कमाई पाहिली तर एकूण 7.86 कोटी ही तब्बल प्री-सेल्स बूकिंग झाली आहे. यात सगळ्यात जास्त तिकिटांची विक्री ही दिल्ली-एनसीआर (1.31 कोटी), महाराष्ट्र (1.57 कोटी), राजस्थान (56.02 कोटी) आणि गुजरात (64.03 लाख) झाली आहे.
हेही वाचा : वयानं खूप लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत काम करण्याविषयी सलमान खाननं सोडलं मौन; म्हणाला...
सलमान खानचा सगळ्यात शेवटी प्रदर्शित झालेला 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला होता. तरी देखील या चित्रपटाच्या तिकिटांच्या बूकिंगची आगाऊ बूकिंग ही तब्बल 877055 इतकी झाली होती. यात 22.97 कोटींची एकूण कमाई झाली होती. 'सिकंदर' विषयी बोलायचं झालं तर अजूनही त्यानं 20 कोटींचा आकडा देखील पार केलेला नाही. तर शेवटच्या दोन दिवसात तिकिटांच्या आगाऊ बूकिंगची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.