Marathi News> मनोरंजन
Advertisement

'छावा'समोर 'सिकंदर' ठरला सुपरफ्लॉप, बजेट निघणेही झालं कठीण, 10 दिवसांची कमाई फक्त...

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट बॉक्स ऑफिवर सुपरफ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाला 10 दिवसांमध्ये बजेट इतकीही कमाई करता आली नाही. 

'छावा'समोर 'सिकंदर' ठरला सुपरफ्लॉप, बजेट निघणेही झालं कठीण, 10 दिवसांची कमाई फक्त...

Sikandar Box Office Collection Day 10: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक  एआर मुरुगदास आहेत. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला आहे. पहिल्या दिवशी 'सिकंदर' चित्रपटाने चांगली कमाई केली. परंतु, चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली. तेव्हा पासून सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट 1 कोटीच्या कमाईसाठी प्रचंड संघर्ष करताना दिसत आहे. 'सिकंदर' चित्रपटाने 10 व्या दिवशी किती कमाई केली याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 

2025 च्या सुरुवातीपासूनच सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु होती. हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून सलमान खानचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही.  त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर खूप परिणाम झाला. या चित्रपटातील सलमान खानचा अभिनय पाहून चाहत्यांनी त्याच्यावर टीका सुरु केली आहे. 

'सिकंदर' चित्रपटाची 10 दिवसांमध्ये किती कमाई? 

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 90.25 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण सुरु झाली. या चित्रपटाने सहाव्या दिवशी 3.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर सातव्या दिवशी चित्रपटानं 4 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी या चित्रपटाने 4.75 कोटी रुपये कमावले. नवव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी घसरण झाली. त्या दिवशी चित्रपटाने 1.75 कोटी रुपयांची कमाई केली. 

दरम्यान, 'सिकंदर' चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने दहाव्या दिवशी सॅक्निल्कच्या रिपोर्टनुसार, 1.35 कोटींची कमाई केली आहे. एकूण 10 दिवसांमध्ये सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने तब्बल 105.60 कोटींची कमाई केली आहे. 

सलमानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप 

'सिकंदर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई ही निराशाजनक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे चित्रपटाला 200 कोटी रुपयांचा आकडा गाठणंही कठीण झाल्याचं बघायला मिळत आहे. 

Read More