Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sikandar : सलमान खानच्या चित्रपटाचे प्रदर्शन होण्यापूर्वीच पैसा वसूल, झटक्यात कमवले 165 कोटी

Sikandar Salman Khan : सलमान खानच्या 'सिकंदर'नं चित्रपटानं प्रदर्शना आधीच कमावले 165 कोटी

Sikandar : सलमान खानच्या चित्रपटाचे प्रदर्शन होण्यापूर्वीच पैसा वसूल, झटक्यात कमवले 165 कोटी

Sikandar Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या निमित्तानं चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ईदच्या निमित्तानं सलमाचे चित्रपट हे प्रदर्शित होतात. मजेशीर गोष्ट म्हणजे प्रदर्शनाआधीच सगळ्यांना या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता आहे. खरंतर या चित्रपटानं प्रदर्शनाच्या आधीच 165 कोटींची कमाई केली आहे. तर निर्मात्यांसोबतच इतरांनाही आशा आहे की प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बक्कळ कमाई करणार आहे.

साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनर खाली तयार झालेला हा चित्रपट हिंदीमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा ठरू शकतो असं म्हटलं जातंय. IMDb वर यंदाच्या वर्षी मोस्ट अवेटेड चित्रपट म्हटलं आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर हे कलाकार आहेत. निर्मात्यांनी अजून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी घोषणा केली नाहिये. पण परदेशात 30 मार्च रोजी आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. या सगळ्यात 'सिकंदर' नं नॉन थिएट्रिकल राइट्सवरून डील झाली आहे. त्यामुळे प्रोडकाशन कॉस्टचा 82.5 टक्के भाग हा प्रदर्शनाच्या आधीच वसूल झाला आहे. 

'पिंकविला' च्या रिपोर्ट्सनुसार, निर्माता साजिद नाडियाडवालानं 'सिकंदर' चे नॉन-थिएट्रिकल राइट्स याचाच अर्थ डिजिटल, सॅटेलाइट आणि म्यूजिक राइट्स हे जवळपास 165 कोटींना विकले आहेत. आता जर प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली तर त्याचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. आता जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कलेक्शन करेल तर या डीलची किंमत या आधारावर आणखी वाढू शकते. रिपोर्ट्सनुसार, 'सिकंदर' ची पोस्ट-थ्रिएट्रिकल डीलमध्ये ही नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मशी झाली आहे. तर ही डील 85 कोटींसाठी झाली. या डीलमध्ये हे देखील सांगण्यात आलं आहे की जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 350 कोटींपेक्षा अधिक कमाई करत असेल तर OTT ची डील 100 कोटींपर्यंत जाऊ शकते. 

हेही वाचा : प्रियांका चोप्रानं इतक्या कोटींला विकले मुंबईतील 4 फ्लॅट्स, कोणी आणि कितीला खरेदी केले? जाणून घ्या

अशा प्रकारे निर्मात्यांनी Zee सोबत 'सिकंदर' चे सॅटेलाइट राइट्स अर्थात टिव्हीवर प्रदर्शनाचे हक्क जवळपास 50 कोटींना विकल्याचे म्हटलं जात आहे. तर झी म्युझिक कंपनीसोबत 30 कोटी रुपयांची डील झाल्याचे म्हटले जात आहे. अजून यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या डीलवरून असं दिसून येत आहे की सलमान खानच्या या चित्रपटानं प्रदर्शनाच्या आधीच 165 कोटी रुपये कमावले आहेत. हा आकजा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 180 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. पण हा आकजा बॉक्स ऑफिसवर कलेक्शनवर देखील आधारीत आहे. 

Read More