Sikandar Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट सिकंदर हा काल 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाल्यानं सलमानच्या चाहत्यांना खूप उत्साह होता. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये हा चित्रपट बक्कळ कमाई करणार अशी अनेकांना आशा होती. त्याशिवाय या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असं म्हटलं. दरम्यान, काल या चित्रपटानं पहिल्याच दिवशी किती कमाई केली याविषयी जाणून घेऊया.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार सिकंदरनं भारतात 26 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइट आकडा हा 40 कोटींचं कलेक्शन केल्याची आशा आहे. सिकंदरनं ईदच्या आधल्या दिवशी अर्थात 30 मार्च रोजी हिंदीत हा चित्रपट पाहण्यासाठी 21.60 टक्के लोक थिएटरमध्ये बसले होते. सकाळी शोच्यावेळी 13.76 टक्के थिएटर भरलं होतं. तर संध्याकाळी हा आकडा 25 टक्क्यांवर गेला होता. दरम्यान, संध्याकाळच्या शोसाठीची टक्केवारी आणखी कमी झाली. तर ट्रेड अॅनालिस्टनं 25 ते 26 कोटींचं एकूण कलेक्शन केलं आहे.
सलमान खानच्या ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर त्याच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान' नं 27.27 कोटींचं कलेक्शन केलं. तर 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या किकनं 24.97 कोटींची कमाई केली आणि 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग 3 नं 22.29 कोटींची कमाई केली. तर सिकंदरविषयी बोलायचं झालं तर रविवारी ईदच्या आधल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद केला आहे.
हेही वाचा : 'तिच्याकडे कैची होती...'; मलायका तयार होत असताना अचानक 'ती' घरात शिरली अन् मग...
दरम्यान, सगळ्यांना अपेक्षा आहे की सिकंदर हा सोमवारी म्हणजे आज दुसऱ्या दिवशी चांगली कमाई करेल. त्याचं कारण म्हणजे आज ईद आहे आणि त्यासोबत सुट्टी देखील आहे. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी जातील. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर सलमान खानसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन हे एआर मुरुगादॉस आहेत.