Marathi News> मनोरंजन
Advertisement

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे.

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

मुंबई : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. इंदापूरजवळ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने झालेल्या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. पण त्यांचा चालक या अपघातात गंभीर जखमी असल्याचे समजतंय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. त्याच निमित्तानं काल ते आपल्या गावी निघाले होते. रात्री दोनच्या सुमारास इंदापूरजवळ वरकुटे येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला.

या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत, पण  गाडीचं मात्र मोठं नुकसान झाले आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तर चालक गंभीर जखमी आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Read More